भयावह! एका हातात पत्नीचं कापलेलं शिर, दुसऱ्या हातात चाकू अन् चेहऱ्यावर हास्य; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 11:53 AM2022-02-09T11:53:08+5:302022-02-09T11:55:13+5:30
Crime News : एक विकृत तरुण आपल्या पत्नीचं कापलेलं शिर घेऊन रस्त्यावर फिरत आहे. खळबळजनक घटना घडली असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
जगभरात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर अंगावर काटा आणणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक विकृत तरुण आपल्या पत्नीचं कापलेलं शिर घेऊन रस्त्यावर फिरत आहे. इराणध्ये ही खळबळजनक घटना घडली असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पत्नीचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं समजताच या व्यक्तीने हे टोकाचं पाऊल उचललंय. 17 वर्षीय मोना हैदरी हिचा पती आणि दिराने अहवाज शहरामध्ये खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. इराणच्या ISNA वृत्तसंस्थेनं यासंदर्भातली माहिती दिली आहे.
स्थानिक पोलिसांचा हवाला देत वृत्तसंस्था IRNA ने वृत्त दिलं आहे. यामध्ये सोमवारपर्यंत अधिकाऱ्यांनी दोन लोकांना अटक केली होती. या घटनेमुळे इराणच्या महिला प्रकरणांशी संबंधित असलेले उपाध्यक्ष एन्सिह खझाली यांनी संसदेत अधिकाऱ्यांना अशा घटना टाळण्याकरिता तत्काळ उपाययोजना करण्यासाठी आणि जागरुकता वाढविण्याचं आवाहन केलं आहे. इराणी वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावर हत्येबद्दल संताप पाहायला मिळत आहे. अनेकांनी सामाजिक आणि कायदेशीर सुधारणांचे आवाहन केलं आहे.
"गुन्ह्याला आपण सर्व जबाबदार आहोत"
सुधारवादी दैनिक सझांदेगी यांनी एका व्यक्तीचा शिरच्छेद करण्यात आला होता. त्याचं शिर रस्त्यावर दाखवण्यात आलं आणि मारेकऱ्याला त्याचा अभिमान वाटत होता. अशी शोकांतिका आपण कशी स्वीकारू? पुन्हा कोणत्याही महिलेसोबत असे घडू नये यासाठी आपण कारवाई केली पाहिजे असं म्हटलं आहे. लोकप्रिय स्त्रीवादी चित्रपट निर्मात्या तहमीने मिलानी (Tahmineh Milani) यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं, "मोना हैदरीने जीव गमावला. या गुन्ह्याला आपण सर्व जबाबदार आहोत" असं म्हटलं आहे.
"इराणमध्ये लग्नाचे किमान वय 13 वर्षे"
हैदरी यांच्या हत्येनंतर महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची आणि लग्नासाठी कायदेशीर वय वाढवण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. सध्या इराणमध्ये लग्नाचे किमान वय 13 वर्षे आहे. इराणी मीडियाच्या म्हणण्यानुसार, पीडितेचे लग्न झाले तेव्हा ती केवळ 12 वर्षांची होती आणि तिची हत्या झाली तेव्हा तिला तीन वर्षांचा मुलगा होता. वकील अली मोजताहेदजादेह यांनी सुधारणावादी पेपर शार्गमध्ये ऑनर किलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी कायदेशीर पळवाटांना जबाबदार ठरवलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.