बदल्याची आग! Ex गर्लफ्रेंडवर झाडल्या गोळ्या नंतर स्वत:ही नदीत उडी मारुन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 01:23 PM2022-07-27T13:23:35+5:302022-07-27T13:23:56+5:30
Crime News : एका विवाहित व्यक्तीने आपल्याला धोका दिलेल्या एक्स प्रेयसीची गोळी झाडून हत्या केली आणि नंतर स्वत:ही नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.
नवी दिल्ली - प्रेमात काही लोक वाटेल ते करतात. धोका मिळाला तर काही जण टोकाचं पाऊल उचलतात. जीवही घेऊ शकतात. अशीच एक धक्कादायक घटना आता मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात घडली आहे. एका विवाहित व्यक्तीने आपल्याला धोका दिलेल्या एक्स प्रेयसीची गोळी झाडून हत्या केली आणि नंतर स्वत:ही नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता सत्य समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरमधील पोलीस चौकी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नर्मदा पुलावर 23 जुलै रोजी जोगनी नगर रामपूर निवासी अनिभा केवट हिचा मृतदेह एका कारमध्ये होता. अनिभाची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीचा मृतदेह सापडल्याच्या तीन दिवसानंतर पटेलचा मृतदेहही तिलवारा पुलाजवळ आढळला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी खोट्या पत्रकार गँगवर झालेल्या पोलीस कारवाईनंतर पटेलला देखील अटक करण्यात आली होती आणि त्याला जेलमध्ये पाठवलं होतं. दुसरीकडे त्याची प्रेयसी अनिभाचं मनी ट्रान्जेक्शन कंपनीच्या मॅनेजरसोबत अफेअर सुरू होतं. जेव्हा बादल पटेल तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याला आपल्या प्रेयसीबद्दल कळालं, यानंतर तो संतापला. त्याने आपल्या प्रेयसीला समजावण्यासाठी आयटी पार्कस्थित ऑफिसच्या बाहेर बोलावलं आणि तिला आपल्या मित्राच्या कारमध्ये बसवून नर्मदा पुलावर घेऊन गेला.
दोघांमध्ये भांडण झालं आणि बादल पटेलने अनिभाला गोळी घातली. यात तिचा मृत्यू झाला. यानंतर त्याने अनिभाचा मृतदेह कारमध्येच ठेवला आणि स्वत: नर्मदा नदीत उडी मारल्य़ाची घटना घडली आहे. पोलिसांना नदीमध्ये मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच अधिक चौकशी केली असता हा भयंकर प्रकार समोर आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.