नात्याला काळीमा! पिताच झाला हैवान; दारूच्या नशेत मित्रांसह 9 वर्षीय लेकीवर केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 02:54 PM2022-05-02T14:54:38+5:302022-05-02T15:01:54+5:30
Crime News : पोलिसांनी सामूहिक बलात्कारातील तिघांना अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
नवी दिल्ली - छत्तीसगडमधील जशपूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. पिताच हैवाऩ झाला असून दारूच्या नशेत मित्रांसह 9 वर्षीय लेकीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. नऊ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. दारूच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर पीडितेने तिच्या आजीला माहिती दिली. त्यानंतर हा भयंकर प्रकार समोर आला आहे. पोलिसांत तक्रार करण्यात आली.
पोलिसांनी सामूहिक बलात्कारातील तिघांना अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जशपूरच्या नारायणपूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात हा आरोपी आपल्या तीन मुलांसह आणि वृद्ध आई-वडिलांसोबत राहत होता. आरोपीच्या पत्नीचा 2019 मध्ये मृत्यू झालेला आहे. 28 एप्रिलला रात्री दारूच्या नशेत आरोपी त्याच्या दोन मित्रांसह आपल्या घरी आला. यावेळी त्याची तिन्ही मुलं (एक 3 वर्षांचा, तर दुसरा 6 वर्षांचा मुलगा आणि 9 वर्षांची मुलगी) झोपले होते.
आरोपीने आपल्या 9 वर्षाच्या मुलीला झोपेतून उठवले आणि तिला दुसऱ्या रुममध्ये घेऊन गेला. यानंतर त्याने मित्रांसोबत आपल्याच मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीने आपल्या लहान भावांना तसेच आजीला याबाबत सांगितले. पीडित मुलगी जवळच्या गावात असलेल्या आपल्या आजीकडे तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिने आपल्या आजीला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तिच्या आजीने नारायणपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पीडित मुलीच्या आजीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पिता आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात 376 (घ) 376 (क,ख) पॉस्को कायदा 4,6,17 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.