बापरे! अंत्यसंस्कार सुरू असतानाच पोलीस आले अन् चितेवरून मृतदेहच घेऊन गेले; 'हे' आहे नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 05:45 PM2021-08-23T17:45:25+5:302021-08-23T17:52:07+5:30
Crime News : कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार सुरू करण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना पुन्हा एकदा हरियाणात घडली आहे. गावातील एका महिलेची हत्या करण्यात आली होती. मात्र पोलिसांना याबाबत सुचना न देताच कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार सुरू करण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच चिता विझवून मृतदेह तपासणीसाठी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. एका महिलेची हत्या झाल्यावर पुरावे मिटवण्यासाठी तिच्यावर घाईघाईत अंत्यसंस्कार उरकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील माजरा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सासरच्या मंडळींनी सुनेला मारहाण करून तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुरावे मिटवण्यासाठी सूनेवर घाईघाईनं अंत्यसंस्कार होत असल्याचं समजताच पोलीस अग्निशमन दलाचा बंब घेऊनच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्मशानात पोहोचून अंत्यसंस्कार थांबवण्याची सूचना केली. मात्र तोपर्यंत चितेला अग्नी देण्यात आला होता आणि लाकडांनी पेट घेतला होता. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने तातडीने ही चिता विझवली आणि मृतदेह ताब्यात घेतला.
भयंकर! मुलांच्या भांडणावरून पालकांमध्ये रक्तपात; एक जण गंभीर जखमी, परिसरात खळबळ#Crime#Policehttps://t.co/0a1JoaJkRJ
— Lokmat (@MiLOKMAT) August 23, 2021
सध्या सरकारी रुग्णालयाच्या शवागारात हा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह ठेवण्यात आला असून याबाबत अधिक तपशील द्यायला पोलिसांनी नकार दिला आहे. शवविच्छेदन अहवालातूनच याबाबत काही अधिक माहिती मिळू शकेल असं पोलिसांनी म्हटलं आहे. स्मशानभूमीत पोहोचण्यापूर्वी पोलिसांनी फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमलाही घटनास्थळी बोलावलं होतं. मृतदेहाची तपासणी करून काही महत्वपूर्ण पुरावे आणि धागेदोरे मिळतात का याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. सासरच्या मंडळींची ही चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बापरे! कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा शेजाऱ्याने 'असा' घेतला गैरफायदा; घराचे खोटे पेपर तयार केले अन्...#coronavirus#crime#Policehttps://t.co/JdwVpbxbpU
— Lokmat (@MiLOKMAT) August 23, 2021
तुफान राडा! छोट्यांच्या भांडणावरून मोठ्यांमध्ये जोरदार हाणामारी; तलवारीने केला प्राणघातक हल्ला
छोट्या मुलांवरून पालकांमध्ये देखील मोठी भांडणं होतात. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. छोट्यांच्या भांडणावरून मोठ्यांमध्ये रक्तपात झाला आहे. मुलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण आणि हाणामारी झाली. याबाबत समजल्यानंतर दोन्ही मुलांचे पालक आक्रमक होत एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यात हाणामारी झाली. पालकांमध्ये झालेल्या हाणामारीत एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला तलवार लागली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. भोपाळमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
'तिच्या' प्रियकराला मारण्यासाठी 'तो' तांत्रिकाकडे गेला अन् स्वत:चा जीव गमावून बसला; नेमकं काय घडलं? #Crime#Policehttps://t.co/2kptNCTNK3
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2021