क्रूरतेचा कळस! दात तोडले, गरम तव्याने चटके दिले; भाजपाच्या महिला नेत्याची मोलकरणीला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 10:46 AM2022-08-30T10:46:50+5:302022-08-30T10:53:56+5:30

Crime News : भाजपा नेत्या सीमा पात्रा यांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे. त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Crime News jharkhand bjp leader seema patra allegedly tortured her maid | क्रूरतेचा कळस! दात तोडले, गरम तव्याने चटके दिले; भाजपाच्या महिला नेत्याची मोलकरणीला मारहाण

क्रूरतेचा कळस! दात तोडले, गरम तव्याने चटके दिले; भाजपाच्या महिला नेत्याची मोलकरणीला मारहाण

Next

नवी दिल्ली - झारखंडमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. माजी आयएएस अधिकाऱ्याची पत्नी आणि भाजपा नेत्या सीमा पात्रा यांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे. त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुनीताने दिलेल्या माहितीनुसार, सीमा पात्रा यांनी तिला अनेक दिवसांपासून उपाशी ठेवलं, एका खोलीत बंद केलं. तसेच  लोखंडी रॉडने मारून तिचे दात तोडले आहेत. गरम तव्याने तिच्या शरीरावर चटके दिले, ज्याच्या खुणा शरीरावर अजूनही आहेत. 

पोलिसांनी सुटका केल्यानंतर सुनीतावर सध्या रिम्समध्ये उपचार सुरू आहेत. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, जेव्हा तिला रुग्णालयात आणलं तेव्हा ती खूप अशक्त होती, हळूहळू तिची प्रकृती स्थिती सुधारत आहे. सुनीताने सांगितलं की, मॅडमचा मुलगा आयुष्मानने तिला या सर्वातून वाचवलं. तिला एका खोलीत बंद केलं गेलं होतं. तिला कित्येक दिवस अन्न दिलं नाही, त्यामुळे ती खूप अशक्त झाली. तिला व्यवस्थित उभा राहता येत नसतानाही तिला काम करायला लावलं होतं. 

काँग्रेसने साधला निशाणा

पीडिता अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. ती बरी झाल्यानंतर न्यायालयात जबाब नोंदवला जाईल. तिच्या वक्तव्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून अद्यापही सुरू आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. काँग्रेस आमदार दीपिका सिंह पांडे यांनी ट्विटद्वारे भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाच्या मोठ्या नेत्यांना टॅग केलं आहे. 

"भाजपाचा महिला मोर्चा का झोपला आहे?"

"धिक्कार आहे तुमच्या नेत्या सीमा पात्रा यांचा, ज्यांनी ओलीस ठेवलेल्या महिलेसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. स्मृती इराणी कुठे आहेत, भाजपाचा महिला मोर्चा का झोपला आहे? रस्त्यावर उतरा आणि या महिलेसाठी कठोर शिक्षेची मागणी करा. महिला आयोग या महिलेच्या विरोधात कारवाई का करत नाही?" असं दीपिका सिंह पांडे यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Crime News jharkhand bjp leader seema patra allegedly tortured her maid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.