भयंकर! 12 तासांत 5 खून, एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; मन सुन्न करणारी घटना, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 12:37 PM2021-10-03T12:37:40+5:302021-10-03T12:44:20+5:30
Crime News : गेल्या 12 तासांत कानपूरमध्ये पाचवा खून करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून दहशत पसरली आहे.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. कानपूरमध्ये ही अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. फजलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कुटुंबातील तीन लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गेल्या 12 तासांत कानपूरमध्ये पाचवा खून करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून दहशत पसरली आहे. परिसरात प्रेम किशोर परचून यांचा दुकान आहे. त्या दुकानामागेच त्यांचं घर देखील आहे. रात्री प्रेम किशोर, त्यांची पत्नी गीता, मुलगा नैतिक जेवण करून झोपी गेले होते. मात्र सकाळ झाली तरी दुकान उघडलं नसल्याने परिसरातील लोक त्यांच्या घरी गेले.
लोकांनी खूप वेळ दरवाजा ठोकला पण कोणीच बाहेर आले नाही. यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावेळी घरामध्ये तिघांचे मृतदेह आढळून आले. मृतदेह पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सध्या पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड टीम, सर्व्हिलान्स टीम याचा अधिक तपास करत आहे. तसेच पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला जात. आहे. पोलीस अधिकारी संजीव त्यागी यांनी अधिक तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे.
फजलगंज थाना क्षेत्र में एक घर में परिवार के 3 लोगों के शव मिले हैं। पुलिस की फॉरेंसिक यूनिट, डॉग स्क्वायड की टीम, सर्विलांस की टीम काम में लगी हैं। कुछ सुराग भी मिले हैं जिसके आधार पर छानबीन की जा रही है। जल्द इस घटना का खुलासा किया जाएगा: संजीव त्यागी, DCP, कानपुर pic.twitter.com/nk5EtarE9O
— ANI_HindiNews (@AHindinews) October 2, 2021
पती-पत्नीच्या शरीरावर जखमांच्या असंख्या खुणा
पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पती, पत्नी आणि मुलगा हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहायला मिळालं. मृतांच्या नातेवाईकांनी प्रेम यांचं कोणाशीच भांडण अथवा वैर नसल्याचं म्हटलं आहे. संजीव त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची हत्या ही गळ्या दाबून करण्यात आली आहे. तर पती-पत्नीच्या शरीरावर जखमांच्या असंख्या खुणा आहेत. पोलीस याचा वेगाने तपास करत असून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.