लेकीला न्याय मिळावा म्हणून बापाची धडपड; चितेवरुन बाहेर काढला अर्धवट जळालेला मृतदेह अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 06:00 PM2022-05-27T18:00:02+5:302022-05-27T18:06:43+5:30

Crime News : एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर जळत्या चितेवरुन महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढण्यात आला होता.

Crime News karauli news father fought for 5 year to get his daughter justice | लेकीला न्याय मिळावा म्हणून बापाची धडपड; चितेवरुन बाहेर काढला अर्धवट जळालेला मृतदेह अन्...

लेकीला न्याय मिळावा म्हणून बापाची धडपड; चितेवरुन बाहेर काढला अर्धवट जळालेला मृतदेह अन्...

Next

नवी दिल्ली - राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर जळत्या चितेवरुन महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मृत मुलीचे वडील होते. त्यांनी आपल्या जावयाविरोधात मुलीची हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तब्बल 5 वर्षे बाप आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी लढत होता. आता पाच वर्षांनंतर त्यांच्या मुलीला न्याय मिळाला असून तिची हत्या करणारा तुरुंगात आहे. 

गुरुवारी आरोपी पतीला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सोबतच 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करोली जिल्ह्यातील सुरोठ निवासी मदनलाल जोगी यांच्या मुलीचं लग्न रसेली निवासी हंसेसोबत झालं होतं. 15 मार्च 2017 रोजी पती राकेश आणि त्याच्या नातेवाईकांनी हुंड्याची मागणी करीत हेमाची हत्या केली. 

गुपचूपपणे यानंतर हेमावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र याची सूचना मिळताच मृत महिलेचेवडील तेथे पोहोचले. त्यांनी पाहिलं की, मुलीचा मृतदेह चितेवर जळत आहे. पोलिसांना याबाबत सांगितलं, यानंतर हेमाचा अर्धवट जळालेला मृतदेह चितेवरुन बाहेर काढला आणि त्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं. 

हेमाच्या पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाच वर्षांपर्यंत वडील आपल्या मृत मुलीला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करीत होते. मुलीची हत्या करणाऱ्या तिच्या पतीला कडक शिक्षा व्हावी यासाठी ते लढत होते. गुरुवारी न्यायालयाने पती राकेशला दोषी मानत त्याला शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News karauli news father fought for 5 year to get his daughter justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.