खळबळजनक! भाजपा आमदाराच्या त्रासाला कंटाळून 4 शेतकऱ्यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 01:04 PM2022-06-15T13:04:46+5:302022-06-15T13:11:08+5:30

Crime News : जमिनीशी संबंधित प्रकरणामध्ये भाजपाचे आमदार नेहरू ओलेकर हे शेतकऱ्यांनी त्रास देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Crime News karnataka haveri four people attempt to suicide by consuming poison bjp mla land dispute | खळबळजनक! भाजपा आमदाराच्या त्रासाला कंटाळून 4 शेतकऱ्यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक! भाजपा आमदाराच्या त्रासाला कंटाळून 4 शेतकऱ्यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

Next

नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. हावेरी येथील चार शेतकऱ्यांनी एका भाजपा आमदाराला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. चारही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जमिनीशी संबंधित प्रकरणामध्ये भाजपाचे आमदार नेहरू ओलेकर हे शेतकऱ्यांनी त्रास देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारच्या वतीने एका योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काही जमीन देण्यात आली होती. गावातील जवळपास 29 लोकांनी ही जमीन मिळाली होती. प्रत्येक शेतकऱ्यांना एक एकर 15 गुंठे जमीन देण्यात आलेली. सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या जमिनीचा काही हिस्सा भाजपाचे आमदार नेहरू ओलेकर मागत आहेत. तसेच शेतकऱ्यांकडे खूप कमी किमतीत पाच गुंठा जमिनीची मागणी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

भाजपाच्या आमदाराने केलेल्या या मागणीच्या विरोधात शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. यासोबतच जमीन देण्यास स्पष्ट नका दिला. पण शेतकऱ्यांनी नकार दिल्यानंतर भाजपा आमदार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाला त्रास देत आहे, त्यांचा छळ करत आहे. सर्व्हे ऑफिसरला देखील त्याने शेतात जाऊ दिले नाही. य़ाशिवाय शेतात काम करणाऱ्या मजुरांना देखील धमकी दिली आणि काम करू नका असं सांगितल. 

भाजपा आमदाराच्या त्रासाला कंटाळून पंडप्पा लमाणी, गुरुचप्पा लमाणी, गंगवा कबूर आणि हनुमंथप्पा यांनी आपल्या शेतात विष खाऊन टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या चौघांनी अत्यंत विषारी कीटकनाशक प्यायले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News karnataka haveri four people attempt to suicide by consuming poison bjp mla land dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.