संतापजनक! हुंड्यासाठी सासरच्यांनी काढला सुनेचा काटा; अवघ्या महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 04:17 PM2022-03-02T16:17:22+5:302022-03-02T16:24:57+5:30

Crime News : हुंड्यासाठी सासरची मंडळी हैवान झाल्याचं पाहायला मिळालं. दोन लाखांसाठी सासरच्यांनी सुनेची हत्या केली आहे.

Crime News killed newlyweds girl for dowry demand in laws run away uttar pradesh | संतापजनक! हुंड्यासाठी सासरच्यांनी काढला सुनेचा काटा; अवघ्या महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न

संतापजनक! हुंड्यासाठी सासरच्यांनी काढला सुनेचा काटा; अवघ्या महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न

Next

नवी दिल्ली - लखनऊमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी सासरची मंडळी हैवान झाल्याचं पाहायला मिळालं. पैशांसाठी त्यांनी सुनेचा काटा काढला आहे. दोन लाखांसाठी सासरच्यांनी सुनेची हत्या केली आहे. अवघ्या महिनाभरापूर्वीच लग्न झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या मलिहाबाद पोलीस ठाण्याच्या परिसरातील भदवाना गावात एक नवविवाहितेचा संशयात्मद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी तिच्या हत्येचा आरोप सासरच्या मंडळींवर केला आहे. 

महिलेच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पित्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 30 जानेवारी रोजी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे भदवाना य़ेथे राहणाऱ्या राम रामेश्वरसोबत मुलीचं लग्न झालं होतं. मुलगी सासरी गेल्यापासून तिकडचे लोक तिला हुंड्यासाठी त्रास देत होते. तिचा मानसिक आणि शारीरीक छळ केला जात होता. वारंवार तिच्याकडे पैशाची मागणी करण्यात येत होती. मंगळवारी मुलीची हत्या करण्यात आली आहे. 

महिलेची हत्या करून सासरची मंडळी घराचा दरवाजा बंद करून फरार झाली. शेजाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा महिला रक्ताच्या थारोळ्यात असलेली पाहायला मिळाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सासरच्या मंडळींनी मुलीकडे दोन लाखांची मागणी केली होती. ती मागणी पूर्ण न केल्यानेच मुलीची हत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. एसपी हृदेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचं एका महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं. तिच्या गळ्यावर मारहाणीच्या खुणा दिसत आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जात आहे. लवकरच या सर्व गोष्टींची खुलासा होईल. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News killed newlyweds girl for dowry demand in laws run away uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.