डोंबिवलीत भरदिवसा थरार, ज्वेलर्सवर चाकूहल्ला; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 13:14 IST2022-05-18T13:14:49+5:302022-05-18T13:14:56+5:30
डोंबिवली पूर्व येथील आगरकर रोडवर मन्ना ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. मंगळवारी दुपारी साधारण 12 वाजण्याच्या सुमारास बुरखा घालुन एक इसम दुकानात शिरला.

डोंबिवलीत भरदिवसा थरार, ज्वेलर्सवर चाकूहल्ला; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क : डोंबिवली कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून दुकानात चोरीच्या घटना वाढल्या आहेत.मात्र डोंबिवलीत दिवसाढवळ्या आता ज्वेलर्सवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये व व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातवरण निर्माण झालं आहे. याबाबत डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्व येथील आगरकर रोडवर मन्ना ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. मंगळवारी दुपारी साधारण 12 वाजण्याच्या सुमारास बुरखा घालुन एक इसम दुकानात शिरला. या इसमाने तारकनाथ मन्ना यांच्यावर हल्ला केला आणि तो तेथून पळून गेला. मन्ना यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सुदैवाने या घटनेत मन्ना यांचा जीव वाचला. मात्र हा वार नेमका का करण्यात आला? हे अद्याप समजले नाही असं रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.