तुफान राडा! मंदिरासमोर डीजे वाजवला म्हणून वरातीवर दगडफेक; तीन जखमी, 6 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 20:36 IST2022-05-18T20:34:15+5:302022-05-18T20:36:42+5:30
शितला देवीच्या मंदिरासमोरून बँड आणि डीजे पुन्हा सुरू केला आणि सर्वजण पुन्हा नाचू लागले. तेव्हा एका समुदायाच्या काही तरुणांनी वरातीतील पाहुण्यांवर दगडफेक सुरू केली.

तुफान राडा! मंदिरासमोर डीजे वाजवला म्हणून वरातीवर दगडफेक; तीन जखमी, 6 जणांना अटक
नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) राजगड जिल्ह्यात डीजे वाजवण्यावरुन झालेल्या वादानंतर वरातीवर एका समुदायाच्या काही लोकांनी दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये वरातीतील तीन जण जखमी झाले आहेत. बुधवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड जिल्हा मुख्यालयापासून साधारण 38 किलोमीटर अंतरावर जीरापूर भागात मंगळवारी ही घटना घडली. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
जीरापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी जीरापूर येथे एका कुटुंबातील मुलीचं लग्न होतं. रात्री साधारण 11 वाजता सुसनेर ते जीरापूर माताजी भागातील मशिदीसमोरून वरात जात होती. त्यावेळी काही समुदायाच्या तरुणांनी डीजे आणि बँड बंद करण्यास सांगितलं. वरात शांतपणे पुढे सरकली. काही अंतरावर शितला देवीच्या मंदिरासमोरून बँड आणि डीजे पुन्हा सुरू केला आणि सर्वजण पुन्हा नाचू लागले. तेव्हा एका समुदायाच्या काही तरुणांनी वरातीतील पाहुण्यांवर दगडफेक सुरू केली.
दगडफेकीत तीन जण जखमी झाले आहेत. याबाबत सूचना मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. डीजे वाजल्यामुळे झोप उडाल्याचं म्हणत वरातीवर दगडफेक सुरू केली. या प्रकरणात समर लाला, फरहान खान, जुनैद खान, सोहेल खान, साबिर खान, अनस कसाई, डग्गा खान आणि अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एबीपी हिंदीने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.