सासऱ्याने सुनेलाच दिली सासूला संपवण्याची सुपारी; दोघांनाही 'दुसरी' हवी होती, अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 01:03 PM2022-07-16T13:03:19+5:302022-07-16T13:03:31+5:30

चार दिवसांपूर्वी एका महिलेची हत्या झाल्याचा फोन मनगवा पोलिसांना आला होता. यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली.

Crime News Madhya Pradesh The father-in-law gave money to the daughter-in-law to kill the mother-in-law in extra marital affaire | सासऱ्याने सुनेलाच दिली सासूला संपवण्याची सुपारी; दोघांनाही 'दुसरी' हवी होती, अडकले

सासऱ्याने सुनेलाच दिली सासूला संपवण्याची सुपारी; दोघांनाही 'दुसरी' हवी होती, अडकले

googlenewsNext

रीवा : मध्य़ प्रदेशच्या रीवा जिल्ह्यामध्ये एका महिलेच्या हत्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेची हत्या करण्यास तिच्या पतीने सुनेलाच सुपारी दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. 

सासऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत  लफडे सुरु होते. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. यामुळे आपल्या पत्नीचा काटा काढण्यासाठी सुनेलाच तिची हत्या करण्यास लावले. यानंतर कहानी रचून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. परंतू सत्य समोर आले.

चार दिवसांपूर्वी एका महिलेची हत्या झाल्याचा फोन मनगवा पोलिसांना आला होता. यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली. या महिलेच्या पतीनेच सुनेला सासूचा खून करण्याची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले. ही महिला आपल्या सुनेला देखील रोज त्रास देत होती. यामुळे सासऱ्याला आपल्या पत्नीचा काटा काढणे सोपे गेले. सून लगेच तिचा खून करण्यास तयार झाली. सुनेने सासूवर कोयत्याने वार केले. पोलिसांनी घटनास्थळ पाहून सासऱा आणि सुनेला अटक केली. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. 
 

Web Title: Crime News Madhya Pradesh The father-in-law gave money to the daughter-in-law to kill the mother-in-law in extra marital affaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.