धक्कादायक! अल्पवयीन मुलांचा कारनामा; You Tube वर व्हिडीओ पाहून घरातच तयार केली हत्यारं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 08:02 PM2022-03-07T20:02:41+5:302022-03-07T20:05:14+5:30
Crime News : मुलांची कसून चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक खुलासा केला. हत्यारं कोणाकडून विकत घेतली नसून ती स्वत: तयार केल्याची माहिती मुलांनी दिली आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यूट्यूबवर व्हिडीओ पाहून अल्पवयीन मुलांनी मोठा कारनामा केला आहे. धन्वंतरी नगर पोलिसांनी वाहन तपासणीदरम्यान दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. त्याच्याजवळ कट्टा आणि चाकू सापडले आहेत. मुलांची कसून चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक खुलासा केला. हत्यारं कोणाकडून विकत घेतली नसून ती स्वत: तयार केल्याची माहिती मुलांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवय़ीन मुलं हनुमानताल येथे राहतात. घरी बसल्या बसल्या दोघांनी युट्यूबवरुन हत्यारं तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं. यानंतर ते घरातच हत्यारं तयार करून विक्री करीत होते. आतपर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात हत्यारं तयार केल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. पोलिसांच्या चौकशीदरम्यान एका मुलाने सांगितलं की, त्याचे वडील इलेक्ट्रिशयन आहे आणि त्यांच्या घरात यासंबंधित बरंच सामान होतं.
सामानाचा वापर करून तो घरातील एका खोलीत यूट्यूबवर पाहून हळूहळू हत्यारं तयार करण्याचं प्रशिक्षण घेऊ लागला. असं करता करता दोघांनी मोठ्या प्रमाणात हत्यारं तयार केली आहे. अल्पवयीन मुलांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत हत्यारांची मोठीच्या मोठी फॅक्टरची दिसली. पोलिसांनी घटनास्थळाहून तीन कट्टे, 8 तलावर, बॉम्ब, ड्रिल मशीन, वेल्डिंग मशील, ग्राइंडर कटरसह हत्यारं तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सापडले. याशिवाय अनेक हत्यारंही सापडली आहेत.
पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करीत त्यांच्यासह सर्व हत्यारं ताब्यात घेतली आहेत. पोलिसांनी सांगितलं की, ही मुलं हत्यारं तयार करण्यास हुशार झाली आहेत. आतापर्यंत ते कट्टा, चाकू, तलवार तयार करीत होते. पुढे गोळी भरली जाणारी पिस्तुल तयार करण्याचा दोघांचा प्लॅन होता. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.