मोठा छापा! नागपूरमध्ये एमडीपीएचने जप्त केल्या तब्बल ६ कोटींच्या बनावट अगरबत्त्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 02:38 PM2022-02-22T14:38:18+5:302022-02-22T14:50:14+5:30

Crime News : नागपूरमधील श्रीफळ गृहउद्योगाच्या दोन गोदामांवर छापे घालून ६ कोटी रुपयांच्या बनावट अगरबत्त्या व धूप उत्पादने जप्त करण्यात आली.

Crime News MDPH seized fake agarbatti worth Rs 6 crore in Nagpur | मोठा छापा! नागपूरमध्ये एमडीपीएचने जप्त केल्या तब्बल ६ कोटींच्या बनावट अगरबत्त्या

मोठा छापा! नागपूरमध्ये एमडीपीएचने जप्त केल्या तब्बल ६ कोटींच्या बनावट अगरबत्त्या

googlenewsNext

नागपूर - दिल्ली येथील जिल्हा न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्यायालय आयुक्तांनी श्रीफळ अँड श्रीसफळ या बनावट ब्रॅण्डवर छापे घातले. नागपूरमधील श्रीफळ गृहउद्योगाच्या दोन गोदामांवर छापे घालून ६ कोटी रुपयांच्या बनावट अगरबत्त्या व धूप उत्पादने जप्त करण्यात आली. नवी दिल्ली येथील जिल्हा न्यायालयाच्या निर्देशावरून हे छापे घालण्यात आले.

झेड ब्लॅक (एमडीपीएच) आपले ब्रॅण्ड संरक्षण उपक्रम आक्रमतेने राबवत आहे आणि बनावट उत्पादने बाजारातून नष्ट करत आहे. बनावट मालाचा धंदा हा जगातील सर्वांत मोठ्या छुप्या उद्योगांपैकी एक आहे आणि हा उद्योग जलद गतीने वाढत आहे. याचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम प्रचंड आहेत. म्हैसूर दीप परफ्युमरी हाउस  (एमडीपीएच) आणि त्यांचा फ्लॅगशिप (प्रमुख) ब्रॅण्ड ‘झेड ब्लॅक’, बनावट झेड ब्लॅक उत्पादनांची निर्मिती व विक्री रोखण्यासाठी, सातत्याने छापे घालत आहे.

एमडीपीएचचे संचालक अंकित अगरवाल, यांनी “भारतातील बनावट अगरबत्त्यांविरोधात सुरू केलेल्या लढ्याचा भाग म्हणून, गुजरात, कोलकाता, ओडिशा आणि पाटणा या देशांतील विविध भागांनंतर, आम्ही महाराष्ट्रातही (नागपूर) छापा घातला. हा गेल्या काही काळातील सर्वांत मोठ्या छाप्यांपैकी एक ठरला. उच्च न्यायालयाच्या आदेशांच्या आधारे आम्ही स्थानिक पोलिसांची मदत घेतली व नागपूरमधील (महाराष्ट्र) श्रीफळ गृह उद्योग कंपनीवर छापा घातला” असं म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले, “आमच्या निष्ठावंत ग्राहकांना केवळ अस्सल उत्पादनेच उपलब्ध व्हावीत आणि हानीकारक ठरू शकणारा बनावट माल विकून त्यांची कुणीही फसवणूक करू नये, याची खात्री करण्याच्या आमच्या मोहिमेचाच हा भाग आहे.”

श्रीफळ गृहउद्योगाचे सुनीलकुमार अमृतलाल जैन यांनी सत्र न्यायालयात खोटी कागदपत्रे सादर केली होती. याविरोधात अपील करून एमडीपीएचने उच्च न्यायालयापुढे बनावट देयके दाखवून सत्य समोर आणले. न्यायालयाने एमडीपीएचने सादर केलेले पुरावे प्रथमदर्शनी (प्रायमा फेसी) ग्राह्य धरले आणि एमडीपीएचला मोठा दिलासा दिला.

एमडीपीएचचे वकील राजेंद्र भन्साळी यांनी "प्रतिवादी आणि त्याची कंपनी एमडीपीएचचे श्रीफळ हे चिन्ह वापरून त्यांची उत्पादने विकत आले आहेत. या प्रकरणात न्यायालयाने हंगामी मनाई हुकूम जारी केला होता, पण त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा हुकूम धाब्यावर बसवला आणि आमच्या श्रीफळ या ब्रॅण्डची नक्कल करून उत्पादनांची विक्री सुरूच ठेवली. त्यांनी श्रीसफळ या सारख्या भासणाऱ्या नावाने ब्रॅण्डही तयार केला. हे गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच आमच्या ग्राहकांपर्यंत अस्सल उत्पादने पोहोचावीत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” असं म्हटलं आहे.
 
न्यायालयाने ट्रेड मार्क प्रकरणात श्रीफळ गृह उद्योग या कंपनीला नोटीस जारी केली होती आणि एमडीपीएचचे श्रीफळ हे चिन्ह किंवा एमडीपीएचच्या श्रीफळ या चिन्हासारखे भासणारे अन्य चिन्ह/नाव किंवा फसव्या पद्धतीने चिन्ह/नाव वापरून कोणताही व्यवहार करण्यास बंदी घातली होती. श्रीफळ गृह उद्योग आणि/किंवा त्यांचे डीलर/वितरक/सहयोगी यांच्याद्वारे श्रीफळ हे नाव/चिन्ह वापरून आणि/किंवा ग्राहकांची फसगत होईल अशा पद्धतीने साधर्म्य असलेले नाव/चिन्ह वापरले जाणे हे एमडीपीएचच्या बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन आहे हे सर्वांना कळावे, अशी आमची इच्छा आहे. याशिवाय, श्रीफळ गृह उद्योग या कंपनीचा, एमडीपीएच किंवा झेड ब्लॅक या देशातील पहिल्या ३ अगरबत्ती उत्पादकांपैकी एक असलेल्या कंपनीशी, कोणताही संबंध नाही, हेही ग्राहकांना कळले पाहिजे.

Web Title: Crime News MDPH seized fake agarbatti worth Rs 6 crore in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.