धक्कादायक! वीज बिल जास्त आल्याने संतापला; रागाच्या भरात मीटर रीडरची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 08:27 AM2023-08-08T08:27:23+5:302023-08-08T08:27:44+5:30

वीज बिल जास्त आल्याच्या रागातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

crime news meter reader hacked to death over inflated bills by electricity company | धक्कादायक! वीज बिल जास्त आल्याने संतापला; रागाच्या भरात मीटर रीडरची केली हत्या

धक्कादायक! वीज बिल जास्त आल्याने संतापला; रागाच्या भरात मीटर रीडरची केली हत्या

googlenewsNext

ओडिशातून एक धक्क्कादायक घटना समोर आली आहे. येथील बेहरामपूर येथे वीज बिल जास्त आल्याच्या रागातून एकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. लक्ष्मी नारायण त्रिपाठी (५२) असे मृताचे नाव आहे. आरोपी गोविंद सेठी (६०) याच्याशी मीटर रीडिंगवरून त्यांचा वाद झाला होता. यात रागातून त्याने हत्या केल्याचे समोर आले आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, त्रिपाठी हे मीटर रीडरचे काम करतात. ते मीटर रीड करण्यासाठी आले होते. यावेळी वीज बिल वाढीवरुन दोघांत जोरदार वाद झाला. दोन्ही बाजूंचे भांडण इतके वाढले. रागात आरोपी गोविंदने त्यांची हत्या केली. लक्ष्मी नारायण त्रिपाठी हे टाटा पॉवर साउथ ओडिशा डिस्ट्रिब्युशन कंपनीत काम करत होते. ते कंपनीचे कर्मचारी नव्हते. कंपनीने मीटर रीडिंगचे काम आउटसोर्स केले होते.

आईच्या प्रियकराने पुलावरून ढकलले, 13 वर्षांच्या मुलीचा पाईपला लटकून पोलिसांना फोन

ही घटना तारासिंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुपाटी गावातील आहे. शेजारच्या गावात राहणारा मयत लक्ष्मी नारायण मीटर रीडिंगसाठी आला होता. मीटरचे योग्य रिडींग करण्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

यादरम्यान सेठीने त्रिपाठी यांच्यावर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या भाचीने आपल्या जबाबात सांगितले आहे की, वाढीव बिलामुळे सेठी रागावला होता. मात्र, लक्ष्मी नारायण यांनी सेठी यांच्या पत्नीसोबत गैरवर्तन केल्याने हे प्रकरण भांडणापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस अधिकारी म्हणाले, 'आरोपींना स्थानिक लोकांनी मारहाण केली. स्थानिक पोलिसांनी आरोपीची लोकांपासून सुटका केली, त्यानंतर त्याला एमकेसीजी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मीटर रीडिंगवरून भांडण सुरू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, या घटनेमागची नेमकी कारणे शोधली जात आहेत. आरोपीची चौकशी सुरू आहे. 

Web Title: crime news meter reader hacked to death over inflated bills by electricity company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.