नात्याला काळीमा! हुंड्यात बाईक आणि 2 लाख दिले नाही म्हणून सासरच्यांनी काढला सुनेचा काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 02:48 PM2022-06-05T14:48:00+5:302022-06-05T14:56:14+5:30

Crime News : हुंड्यासाठी सुनेला फासावर लटकवलं आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. 

Crime News mewat daughter in law killed for not bringing bike and 2 lakhs in dowry | नात्याला काळीमा! हुंड्यात बाईक आणि 2 लाख दिले नाही म्हणून सासरच्यांनी काढला सुनेचा काटा

नात्याला काळीमा! हुंड्यात बाईक आणि 2 लाख दिले नाही म्हणून सासरच्यांनी काढला सुनेचा काटा

Next

नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. हुंड्यासाठी पती हैवान झाला आणि बाईकसह दोन लाख दिले नाही म्हणून त्याने पत्नीचा काटा काढला आहे. हरियाणातील नुह जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली आहे. जिल्ह्य़ातील देवळा नगली गावात हुंड्यासाठी सुनेला फासावर लटकवलं आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, छीतरच्या बास मातोर जिल्हा, अलवर येथील रहिवासी जुमर दीन याने आपली मुलगी वरीशाचा विवाह जवळपास तीन वर्षांपूर्वी देवळा नगली गावात निजामचा मुलगा शेरमल याच्यासोबत केला होता. लग्नात त्यांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे हुंडाही दिला. मात्र हुंड्यात दिलेल्या वस्तुंवर सासरचे लोक समाधानी नव्हते. त्यांना पैशांची आणखी हाव होती.

दोन लाख रुपये हुंडा आणि बाईक आणण्यासाठी वरीशाचा सासरच्या मंडळींकडून अनेकदा छळ केला जात होता. मुलीच्या नातेवाईकांना सासरच्या मंडळींकडून फोनवर सांगण्यात आले की, तुमच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. वरीशाच्या मृत्यूची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंब देवळा नगली गावात पोहोचलं. तेव्हा त्यांना ती मृतावस्थेत दिसली. तसेच तिच्या मानेवर फास लावल्याची खूण असल्याचं नातेवाईकांनी पाहिलं. 

मुलीच्या कुटुंबीयांना या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच त्यांनी जवळच्या पोलीस चौकीला याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वरीशाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्याचबरोबर नातेवाईकांच्या जबाबानुसार पोलिसांनी पती, सासू, सासरा यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: Crime News mewat daughter in law killed for not bringing bike and 2 lakhs in dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.