धक्कादायक! आई घरी नसताना सावत्र वडिल करायचे बलात्कार, सातवीत शिकणाऱ्या मुलीने पोलिसांना फोन केला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 03:04 PM2023-03-18T15:04:06+5:302023-03-18T15:04:19+5:30
सावत्र वडिलांनी सातवीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे.
सावत्र वडिलांनी सातवीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. ही घटना भलस्वी डेअरी परिसरात घडली आहे, आई बाहेर गेल्यानंतर सावत्र वडिल माझ्यावर नेहमी लैंगिक अत्याचार करत होते, असा आरोप मुलीने केला आहे. ही मुलगी सातवीच्या वर्गीत शिकते. वडिलांना विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा. पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १४ वर्षीय तरुणी मुकुंदपूर परिसरात कुटुंबासह राहते. ती सातवीत शिकते. आईने दुसरं लग्न केल्याची माहिती या अल्पवयीन मुलाने पोलिसांना दिली. पूर्वी वडील यूपीच्या मैनपुरी येथे राहत होते. सुमारे ९ वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यावेळी पीडितेचे वय ५ वर्षे होते. वडिलांच्या मृत्यूनंतर आईने दुसरं लग्न केलं. यानंतर सर्व बदाऊन यूपीमध्ये राहू लागले. दुसऱ्या वडिलांच्या २ मुली आहेत. लग्नानंतर काही वेळातच दुसऱ्या वडिलांनी कुटुंबासह सर्वांना दिल्लीला आणले. वडिलांनी दिल्लीत ई-रिक्षा चालवायला सुरुवात केली. आई कारखान्यात खासगी नोकरी करू लागली.
'जेव्हापासून आम्ही दिल्लीला आलो तेव्हापासून सावत्र बाप आमच्यावर घाणेरडी नजर ठेवू लागला. सावत्र वडील आईच्या गैरहजेरीत अश्लील वर्तन करत होते, असा आरोप मुलीने केला आहे. विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पण, आता सावत्र बापाची हिंमत इतकी वाढली आहे की, आई गेल्यानंतर त्याने अनेकवेळा बलात्कार केला. कोणाला काही सांगितले तर जीवे मारेन अशी धमकी वडिलांनी दिली होती, अशी माहिती मुलीने पोलिसांना दिली.
पुण्यात रिक्षा चालकाकडून परराज्यातील युवतीचा विनयभंग; धमकावून घेतला मोबाइल नंबर
१५ मार्च रोजी तिच्या सावत्र बापाने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. यावेळी पीडितेने पोलिसांजवळ तक्रार दिली. मुलीचे मेडिकल झाले. पोलिसांनी मुलीचे समुपदेशन केले. संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरू केली आहे.