धक्कादायक! "ते अत्यंत वाईट कमेंटसह मला घाणेरडा स्पर्श करत होते"; मुलीने ट्रेनमधून मारली उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 02:59 PM2022-05-19T14:59:03+5:302022-05-19T15:00:14+5:30
Crime News : एका 22 वर्षीय विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून होऊन चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.
नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता घडली आहे. बिहारमधील समस्तीपूरमध्ये जनसाधारण एक्स्प्रेसमधून घरी जाणाऱ्या एका 22 वर्षीय विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून होऊन चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. तिला रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुलीचे दोन्ही पाय, हात आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. तिचे दातही तुटले आहेत. ती मुजफ्फरपूरमध्ये नर्सिंगचं शिक्षण घेत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी ट्रेनने बरौनी येथे आपल्या घरी गेली होती. रुग्णालयात दाखल झाल्यावर विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 3.15 वाजता बरौली जाण्यासाठी ती जनसाधारण ट्रेनमध्ये चढली होती. जिथे ती बसली होती, तिथं 6 मुलं होती. ते अत्यंत वाईट आणि घाणेरडे कमेंट करत होते. यानंतर ते घाणेरडा स्पर्श करीत होते. ती त्यांना खूप वैतागली होती. याचा खूप त्रास होत होता. ती दरवाजाजवळ आली.
विद्यार्थिनीने मदतीसाठी घरी फोन केला. त्यावेळी ती मुलं फोन खेचू लागले आणि तिला घाणेरडा स्पर्श करू लागले. ट्रेनमध्ये खूप लोक होते. मात्र कोणीच मदतीसाठी पुढे आलं नाही. काय करावं तिला कळत नव्हतं. म्हणून स्वत:ची अब्रू वाचवण्यासाठी तिने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसेच मुलीच्या कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे.
मुलीने सांगितलं की, ती आरोपींना ओळखत नाही. मुलगी ट्रेनच्या खाली पडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुलीला अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. शिवाय तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. मुलगी बेगूसराय जिल्ह्यात राहणारी आहे. ती आपल्या घरी परतत होती. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर आधी तिच्यावर उपचार सुरू केले. यानंतर तिच्या कुटुंबीयांना फोन करून बोलवण्यात आलं. पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे. आरोपींची ओळख पटताच त्यांना अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.