Crime News: मनसे पदाधिकाऱ्याची महिलेला मारहाण, व्हिडीओ व्हायरल; तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 03:24 AM2022-09-02T03:24:29+5:302022-09-02T03:24:48+5:30
Crime News: दुकानासमोर गणेशोत्सवाबाबतचे बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखल्याच्या रागात मनसेच्या कार्यकर्त्याने महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर जनसामान्यांमधून संताप व्यक्त करण्यात आला.
मुंबई : दुकानासमोर गणेशोत्सवाबाबतचे बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखल्याच्या रागात मनसेच्या कार्यकर्त्याने महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर जनसामान्यांमधून संताप व्यक्त करण्यात आला.
मनसे पदाधिकारी विनोद अरगिले यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसह नागपाडा येथील महिलेच्या दुकानासमोर गणेशोत्सवाबाबतचे बॅनर लावले होते. पण, त्याबाबत महिलेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा दावा तिने केला. ते दुकान गेल्या सात ते आठ वर्षांपासून बंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावरून झालेल्या वादातून महिलेला मारहाण करण्यात आली, तसेच शिवीगाळ देखील करण्यात आली. व्हिडिओनुसार ढकलल्यामुळे महिला खाली कोसळली. याबाबत पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. विनोद अरगिले, राजू अरगिले, राजू लाड यांना अटक करण्यात आली आहे.