हृदयद्रावक! बाळाला मारलं, हात मुरगळा अन्...; घरकाम करणाऱ्या महिलेचं भयंकर रुप, कॅमेऱ्यामुळे पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 07:16 PM2022-03-17T19:16:22+5:302022-03-17T19:21:42+5:30
Crime News : एका महिलेने आपण कामावर गेल्यानंतर बाळाची देखभाल करण्यासाठी घरामध्ये एका महिला ठेवली होती. पण जेव्हा ती महिला घरी परतायची तेव्हा तिचं मूल खूप घाबरलेलं असायचं.
नवी दिल्ली - आजकाल सर्वच कपल हे वर्किंग असतात. मुलांच्या उज्जल भवितव्यासाठी पैसे साठावेत म्हणून अत्यंत कष्ट करत असतात. अनेकदा त्यासाठी ते आपल्या चिमुकल्यांना घरी सोडून काम करण्यासाठी जातात. काही जण लहान मुलांना पाळणा घरामध्ये ठेवतात. तर काही जण घरामध्ये एखाद्या महिलेला मुलाची काळजी घेण्यासाठी बोलावतात. पण अनेकदा हे मुलांसाठी घातक ठरू शकतं. अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बाळाला घरी ठेवून आई कामावर गेली पण नंतर CCTV मधलं भयंकर कृत्य पाहून ती हादरली, तिच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
एका महिलेने आपण कामावर गेल्यानंतर बाळाची देखभाल करण्यासाठी घरामध्ये एका महिला ठेवली होती. पण जेव्हा ती महिला घरी परतायची तेव्हा तिचं मूल खूप घाबरलेलं असायचं. दररोज तो घाबरलेला असायचा हे तिने पाहिलं पण यामागील कारण महिलेला समजत नव्हतं. एकदा तर तिने आपल्या मुलाचा हात फ्रॅक्चर झाल्याचंही पाहिलं. तेव्हा मात्र तिला चिंता अधिक वाटू लागली. सत्य काय आहे हे समजून घेण्यासाठी तिने काम करण्यासाठी ठेवलेल्या महिलेला याची काहीच कल्पना न देता घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवून घेतले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेला जे दिसलं ते पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिला घरामध्ये काम करणाऱ्या महिलेचं भीषण रुप दिसलं. मुलाचे आई-बाबा कामवर गेल्यावर ती चिमुकल्याला क्रूरपणे मारायची, त्याचा भयानक छळ करायचं. महिलेने कॅमेऱ्यात पाहिलं की ती जाताच महिला सुरुवातीला मुलावर मोठ्याने ओरडली. तिने मुलाला अंघोळ घातली त्यानंतर कपडे घालताना मुलगा रडू लागला तेव्हा तिने आधी त्याच्या कानशिलात लगावली आणि त्यानंतर त्याचा हात मुरगळला. त्याला जेवण भरवताना तिने त्याला चमच्याने मारहाण केली.
हे सर्व पाहून महिलेला मोठा धक्का बसला, तिने काम करणाऱ्या या महिलेचं भयानक कृत्य सोशल मीडियावर शेअर केलं आणि पोलिसांनाही याची माहिती दिली. तपासात ही महिला एर मानसिक रुग्ण असल्याचं समजलं. आपल्या मुलांना कोणत्याही लोकांच्या स्वाधीन करण्याआधी तिची नीट माहिती करून घ्या. अज्ञाताच्या भरवशावर सोडू नका, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन तिने इतर पालकांना केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.