Crime News : मॅट्रीमोनियल साईटवरून महिलांना गंडा घालणारा मि. नटवरलाल अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 09:23 PM2022-01-14T21:23:23+5:302022-01-14T21:23:46+5:30

Crime News: मॅट्रीमोनियल साईटवरून महिलांना खोटे प्रोफाइल पाठवून महिलांना स्वतः उच्चपदस्य अधिकारी शास्त्रज्ञ असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांचे कडून वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात पैसे घेऊन व्हायचा पसार

Crime News: Mr. Natwarlal arrested | Crime News : मॅट्रीमोनियल साईटवरून महिलांना गंडा घालणारा मि. नटवरलाल अटकेत

Crime News : मॅट्रीमोनियल साईटवरून महिलांना गंडा घालणारा मि. नटवरलाल अटकेत

Next

ठाणे - मॅट्रीमोनियल साईटवरून महिलांना खोटे प्रोफाइल पाठवून महिलांना स्वतः उच्चपदस्य अधिकारी शास्त्रज्ञ असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांचे कडून वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात पैसे घेऊन पसार होणारा इसम नामे आदित्य , नव्हुश, तन्मय प्रशांत म्हात्रे या महाठगास ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे.

मागील काही दिवसामध्ये जीवनसाथी डॉट कॉम, शादी डॉट कॉम अशा मॅट्रीमोनियल साईटवरून महिलांना खोटे प्रोफाइल पाठवून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांचे कडून वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात पैसे घेऊन त्यांची फसवणूक करण्याच्या घटना निदर्शनास आल्या होत्या त्या अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त श्री जय जीत सिंह यांनी त्याबाबत तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव मालमत्ता शाखा गुन्हे शाखा यांनी शोध घेण्यास सुरवात केली होती.

कल्याण येथे एका महिलेने लग्न जमवणारी संस्था जीवनसाथी या मॅट्रीमोनियल साईटवर आपले प्रोफाईल टाकले होते. त्यातून तिला वर नमूद इसमाने आपण इस्त्रो मध्ये वरिष्ठ पदावर शास्त्रज्ञ असून लग्न करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यावरून ओळख वाढवून सदर महिलेस लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून १४,३६,०००/- रु वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात घेऊन त्यांना पुन्हा २५,००,०००/- ची मागणी केली त्यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी खडकपाडा पोलीस स्टेशन येथे जाऊन रीतसर ०६/२०२२ भादवि कलम ४२०,४०६ माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ डी अन्वये तक्रार नोंदवण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास चालू होता यातील वर नमूद पाहिजे आरोपी हा नेहमी राहण्याचे ठिकाण बदलत होता त्यामुळे तो काही केल्या मिळून येत नव्हता. त्याच वेळी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव मालमत्ता शाखा गुन्हे शाखा यांचे पथकाने त्याबाबत समांतर तपास करून सदर आरोपी याच्याबाबत तांत्रिक माहितीच्या आधारे आणि अत्यंत कौशल्याने तपास करून तो आणखी एका मुलीस लग्नाचे आमिष दाखवून भेटण्याचे निमित्ताने वाशी येथे भेटायला आला असता त्यास पथकाच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे बसून चौकशी केली असता तो इसम विवाहित असून त्यास एक मुलगा देखील आहे. तो नाया, इन्यो मध्ये वरिष पदावर शाखा अथवा मोठया पदावर नोकरीग अगाल्यानी थाप मारून त्याने आतापर्यंत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर तब्बल १४ महिला आणि मुलींची फसवणूक केली असल्याचे निष्प झाले आहे. त्याबाबत अधिक महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत त्याबाबत तपास चालू असून त्यास दि.२०/०१/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर आहे. त्याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळून आली आहे.
 

Web Title: Crime News: Mr. Natwarlal arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.