नात्याला काळीमा! काकीच्या प्रेमात वेडा झाला पुतण्या; पत्नीचा काढला काटा, 'असा' झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 12:06 PM2022-07-07T12:06:30+5:302022-07-07T12:13:53+5:30

Crime News : पोलिसांना नवऱ्यावर संशय आला. त्यांनी अधिक चौकशी केली असता त्याने सर्व खरा प्रकार सांगितला.

Crime News murdered illicit relation chachi bhatija love story wife police arrested rajasthan sirohi | नात्याला काळीमा! काकीच्या प्रेमात वेडा झाला पुतण्या; पत्नीचा काढला काटा, 'असा' झाला पर्दाफाश

फोटो - आजतक

googlenewsNext

नवी दिल्ली - राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात एका महिलेच्या हत्येचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीसह दोन आरोपींना अटक केली आहे. जवळपास आठ महिन्यांपूर्वी महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर आता या धक्कादायक घटनेमागचं सत्य उघड झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंकज नावाच्या व्यक्तीची पत्नी सीमा हिचा मृत्य़ू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पतीने महिलाचा मृत्यू हा विषारी औषध खाल्ल्याने झाल्याचं म्हटलं आहे. 

पोलिसांना नवऱ्यावर संशय आला. त्यांनी अधिक चौकशी केली असता त्याने सर्व खरा प्रकार सांगितला. मृत महिलेच्या रिपोर्टमध्ये तिचा मृत्यू हा विषारी औषधाने नाही तर श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचं समोर आलं. तसेच तिच्या गळ्याभोवती अंगठ्याच्या काही खुणा सापडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक टीम तयार करण्यात आली. पण सुरुवातीला पंकजने पोलिसांना उत्तरं देण्यात टाळाटाळ केली, पण पोलिसांनी पुरावे दाखवताच तो घाबरला. 

पंकजने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात राहणारी मेवा देवी ही पंकजची नात्याने काकी लागते. मात्र या दोघांमध्ये संबंध होते. त्याचीच माहिती पत्नीला मिळाली होती. त्यानंतर ती नातेवाईकांसमोर ही गोष्ट सांगण्याची वारंवार धमकी देत होती. मेवा देवीला जेव्हा हा प्रकार सांगितला तेव्हा तिने पत्नीचा काटा काढण्याचा सल्ला दिला. पत्नीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर तिची गळा दाबून हत्या केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News murdered illicit relation chachi bhatija love story wife police arrested rajasthan sirohi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.