Crime News : धक्कादायक! AC कोचमधून तिला घेऊन गेला, पँट्रीमध्ये नेऊन तरूणीसोबत अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 06:36 PM2022-02-12T18:36:44+5:302022-02-12T18:41:55+5:30
Sampark Kranti 12629: धावत्या ट्रेनमध्ये २१ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
Sampark Kranti 12629: भोपाळ जेआरपी ठाणे क्षेत्रातून जात असलेल्या कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेस ट्रेमध्ये एका मुलीसोबत अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आरोपीनं त्या मुलीला पँट्री कारमध्ये नेत तिच्यावर अत्याचार केल्याचं सांगण्यात आलं आहे. भुसावळहून दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रेनमध्ये एक मुलगी एसी कोचमध्ये असलेल्या शौचालयाजवळ झोपली होती. तिच्याकडे तिकिटही नव्हतं. यादरम्यान, एक व्यक्ती तिच्याजवळ आली आणि त्या व्यक्तीनं विना तिकीट जनरल कोचमध्ये तिला जागा देण्याचं आश्वासन दिल्याची माहिती अॅडिशनल एसपी एस मॅथ्यू यांनी दिली.
यानंतर आरोपीनं तरुणीला पँट्रीकारमध्ये एका ठिकाणी नेलं. त्याठिकाणी आरोपीनं तिच्यावर अत्याचार केले. आरडाओरड केल्यास मारून टाकण्याची आणि धावत्या ट्रेनमधून खाली फेकण्याची धमकी आरोपीनं दिल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. ही घटना रात्री १० च्या सुमारास घडली. त्यानंतर आपण दुसऱ्या कोचमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी असलेल्या दोन जणांना यासंदर्भातील माहिती दिली. त्यानंतर त्यांनी भोपाळ स्टेशनवर जीआरपीला या घटनेची माहिती दिल्याचंही पीडितेनं सांगितलं.
झांसीवरून आरोपीला अटक
यानंतर पँट्रा कारच्या सर्व कामगारांना जीआरपीनं ताब्यात घेतलं. समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीला झांसीवरून अटक करण्यात आली होती. भोपाळ जीआरपीनं दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार तिनं १२ वाजता मुंबईहून दिल्लीला येण्यासाठी ट्रेन पकडली होती. या ट्रेनमध्ये गर्दी असल्यानं ती भुसावळला उतरली. यानंतर तिनं संध्याकाळा सहा वाजता यशवंतपुर-निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये चढली. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.