धक्कादायक! माजी आमदाराच्या ड्रायव्हरला लुटलं; डोळ्यात मिरची पूड टाकून 1.17 लाख केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 10:36 AM2021-12-25T10:36:40+5:302021-12-25T10:37:20+5:30
Crime News : ड्रायव्हर करण यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याच्याकडील 1 लाखापेक्षा अधिक असलेल्या रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
नवी दिल्ली - माजी आमदाराच्या एका ड्रायव्हरला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोळ्यात मिरची पूड टाकून तब्बल 1.17 लाख रुपये लंपास करण्यात आले आहेत. हरियाणाच्या पानिपत शहराच्या माजी आमदार रोहिता रेवडी यांच्या गाडीच्या माजी ड्रायव्हरला चोरट्यांनी लुटलं आहे. ड्रायव्हर करण यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याच्याकडील 1 लाखापेक्षा अधिक असलेल्या रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते छाजपूर येथील निवासी आहे. रात्री साधारण 10 वाजण्याच्या सुमारास तो आपल्या गावाला जात होते. त्यावेळी धान्य गोदामाच्या जवळ येताच नंबर नसलेली एक बाईक आली. बाईकवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्या अंगावर मिरची पूड टाकली. यावेळी करण यांच्या डोळ्यातही मिरची पूड गेली. त्यावेळी चोरट्यांनी करण यांच्या जवळील 1 लाख 17 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
डोळ्यात मिरची पूड टाकली आणि ढकलून दिले
करण यांनी चोरट्यांना विरोध केला तसेच पळून जाणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचाही प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी पुन्हा करण यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्यांना ढकलून दिले. यावेळी करण खाली जमिनीवर पडले. या घटनेवेळी तेथे दुसरी बाईक आली आणि त्यावर तिघेजण बसले होते. एकूण पाच जणांनी मला पकडले आणि मारहाण केली. आरोपींनी मोबाईलही हिसकावला मात्र, तो तेथेच टाकून नंतर पळ काढला. करण यांनी सांगितले की, हे पैसे त्यांनी आपल्या एका मित्राकडून उधार घेतले होते.
गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू
सदर पोलीस स्टेशनचे अधिकारी एसएचओ अतार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, छाजपूर खुर्द येथे राहणारे करण आपल्या घरी जात होते. त्यावेळी दोन बाईकवर आलेल्या आरोपींनी त्यांना रोखले आणि त्याच्याकडील 1 लाख 17 हजारांची रोकड लुटली. आरोपींनी करण यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पळ काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.