Patient raped by ward boy : धक्कादायक! ICU मधील महिलेवर वॉर्डबॉयकडून बलात्कार; व्हेंटिलेटरवर असल्यानं ओरडू शकली नाही, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 22:04 IST2021-03-17T19:54:07+5:302021-03-17T22:04:50+5:30
Crime News Patient raped by ward : सोमवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक प्रकारात खुशीराम गुर्जर नावाच्या वॉर्ड बॉयनं महिलेसह रात्रभर अश्लील चाळे करून अत्याचार केले.

Patient raped by ward boy : धक्कादायक! ICU मधील महिलेवर वॉर्डबॉयकडून बलात्कार; व्हेंटिलेटरवर असल्यानं ओरडू शकली नाही, अन्...
राजस्थानची (Rajasthan )राजधानी जयपूरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रिपोर्ट्सनुसार जयपूरच्या शैल्बी हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या एका महिलेवर वॉर्डबॉयनं बलात्कार केला आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक प्रकारात खुशीराम गुर्जर नावाच्या वॉर्ड बॉयनं महिलेसह रात्रभरअश्लील चाळे करून अत्याचार केले.
या महिलेचं ऑपरेशन झाल्यामुळे तोंडाला मास्क लावला होता. त्यामुळे मदतीसाठी ही महिला ओरडू शकली नाही. सकाळी जेव्हा या महिलेचा पती रुग्णालयात आला तेव्हा एका कागदावर लिहून घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली. रिपोर्ट्सनुसार सदर घटनेतील आरोपीनं अत्याचार केल्यामुळे ही महिला संपूर्ण रात्रभर रडत बसली होती. पोलिसांनी या प्रकारानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करत वॉर्ड बॉयला अटक केली आहे.
भयंकर! मंदिर परिसरातच साधूची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात खळबळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शॅल्बी हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णाचा बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. रात्रीच्या वेळेस महिलेला बेशुद्धावस्थेत पाहून या नराधमानं अश्लिल चाळे करायला सुरूवात केली. सकाळ झाल्यानंतर जेव्हा या महिलेनं इतरांना या धक्कादायक प्रकाराबाबत सांगण्यास सुरूवात केली तेव्हा आरोपीनं या महिलेला धमकावण्याचासुद्धा प्रयत्न केला.
पतीला लिहून सांगितला संपूर्ण प्रकार
दुसर्या दिवशी सकाळी या महिलेचे पती रुग्णालयात पोहोचले तेव्हा महिलेने त्यांना इशारे करून घटनेबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. पतीने घटनेचे गांभीर्य समजून घेतले आणि त्या महिलेला कागद -पेन दिला. त्यानंतर तिने संपूर्ण घटनेविषयी लिहून सांगितले. हा विचित्र प्रकार लक्षात येताच पतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
धक्कादायक! दंगल गर्ल बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या; कुस्तीत पराभव झाल्याने उचललं टोकाचं पाऊल
तक्रार दाखल होताच पोलिसांनी नाडौटी, करौली येथील रहिवासी असलेल्या खुशीराम गुर्जर याला अटक केली. आरोपी जयपूरमधील कानोटा भागातील विजयपुरा येथील कृष्णा धाम येथे राहत होता. पुरुष नर्सिंग कर्मचार्यांव्यतिरिक्त इतर लोकांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.