सूत जुळलं! सुनेचं सासऱ्यावर प्रेम जडलं, 2 मुलांना टाकून घरदार सोडलं अन् भलतंच घडलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 03:03 PM2022-05-22T15:03:37+5:302022-05-22T15:13:04+5:30
Crime News : दोन मुलांची आई तिच्या चुलत सासऱ्यासोबत पळून गेली. दोन्ही मुलांना सोडून पळून गेलेल्या पत्नीमुळे नाराज झालेल्या पतीने गुरुवारी परसा बाजार पोलीस ठाण्यात जाऊन मदतीची याचना केली.
नवी दिल्ली - बिहारमध्ये एक अनोखी घटना घडली आहे. एक महिला आपल्या दोन मुलांना सोडून सासऱ्यासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परसा बाजार पोलीस ठाण्याच्या कुरथौल गावात एक घटना समोर आली आहे. कुरथौल गावातील दोन मुलांची आई तिच्या चुलत सासऱ्यासोबत पळून गेली. दोन्ही मुलांना सोडून पळून गेलेल्या पत्नीमुळे नाराज झालेल्या पतीने गुरुवारी परसा बाजार पोलीस ठाण्यात जाऊन मदतीची याचना केली.
पतीने पोलिसांना सांगितलं की, माझ्या पत्नीचे गावातील चुलत सासऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. मी विरोध केला असता काकाने मला जीवे मारण्याची धमकी दिली. तीन दिवसांपूर्वी पत्नी दोन मुलांना सोडून चुलत सासऱ्यासोबत पळून गेली. यानंतर पोलीस ठाण्यातून परतलेल्या पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी या पळून गेलेल्या पत्नीच्या पतीचा मृत्यू झाला.
मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदन सिंग त्याच्या वडिलोपार्जित घरी दोन मुले आणि पत्नीसोबत कुरथौल येथे राहत होता. यावेळी कुंदनचे गावातील काका जसवंत सिंह त्यांच्या घरी येत असत. घरी येण्याच्या ओघात कुंदनच्या पत्नीचे काका जसवंत सिंग यांच्याशी प्रेमसंबंध सुरू झाले. दोघांच्या नात्याची संपूर्ण गावात चर्चा होऊ लागली. कुंदन सिंग यांनी पारसा बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, जसवंत सिंगच्या पत्नीसोबतच्या अवैध संबंधांमुळे तो खूप नाराज होता.
पोलीस स्टेशनमधून घरी आल्यावर त्याला परिसरातील लोकांचे टोमणे सहन न झाल्यानं त्याने विषारी द्रव्य प्राशन केल्याचं लोकांनी सांगितलं. हॉस्पिटलमध्ये कुंदनने पोलिसांना जबाब दिला की, माझ्या पत्नीचे जसवंत सिंगसोबत अवैध संबंध होते आणि ती काकासोबत पळून गेली. त्यामुळे नाराज होऊन मी विष प्राशन केलं आहे. त्याचवेळी कुंदन सिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुंदनने दिलेल्या माहितीवरून जसवंत सिंग आणि त्याच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.