भाजपा आमदाराच्या अडचणी वाढल्या; मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 02:20 PM2022-02-13T14:20:14+5:302022-02-13T14:21:46+5:30

BJP MLA Vinay Bihari : आमदारावर पाटण्यातील एका मुलीचे अपहरण (Girl Kidnapped) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News patna police has registered fir against bjp mla vinay bihari and 2 others in patna girl kidnapping case | भाजपा आमदाराच्या अडचणी वाढल्या; मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल

फोटो - news18 hindi

Next

बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील लौरिया विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार विनय बिहारी (MLA Vinay Bihari) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आमदारावर पाटण्यातील एका मुलीचे अपहरण (Girl Kidnapped) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीकडून आलेल्या लेखी तक्रारीवरून, आरोपी आमदार विनय बिहारी यांच्या विरोधात पाटणा येथील आगमकुआन पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 366 आणि 120(बी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी विनय बिहारी यांची पत्नी चंचला बिहारी आणि त्यांचा एक नातेवाईक राजीव सिंह यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या कुटुंबियांकडून पोलिसांकडे दिलेल्या अर्जानुसार, मुलीबाबत विनय बिहारी यांच्याशी संपर्क साधला असता, तुला कुठे जायचे आहे, ज्याच्याकडे तक्रार करायची आहे तेथे जा, माझे कोणीही काही करणार नाही, असं म्हटलं. प्रत्यक्षात मुलीच्या अपहरणप्रकरणी एफआयआर दाखल होऊन तीन दिवस उलटले तरी तिचा शोध लागलेला नाही. 

आमदार विनय बिहारी यांच्याशी याबाबत चर्चा केली असता ते म्हणाले की, मला याबाबत काहीही माहिती नाही, मी राजीव सिंह यांचा काका आहे. पीडितेचे कुटुंबीय माझ्यावर विनाकारण आरोप करत आहेत असं म्हटलं आहे. या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अनेकांची चौकशी केली जात आहे. 

जर या लोकांना गुन्हा दाखल करायचा असता तर त्यांनी राजीव सिंहच्या पालकांवर केला असता. दुसरीकडे राजीव सिंह यांच्या आईने सांगितले की, मला याबाबत काहीही माहिती नाही. माझा मुलगा त्याच्या काकांकडे राहतो, त्याने जे केले त्याला त्याचे काका जबाबदार आहेत, आम्ही नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
 

Web Title: Crime News patna police has registered fir against bjp mla vinay bihari and 2 others in patna girl kidnapping case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.