Crime News: निसंतान स्त्रियांना अपत्यप्राप्तीचे स्वप्न दाखवून ढोंगी बाबा करायचा असं काम, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 08:47 PM2022-05-12T20:47:46+5:302022-05-12T20:48:07+5:30

Crime News: बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातून पोलिसांनी एका ढोंगी बाबाला अटक केली आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, हा ढोंगी बाबा अपत्यप्राप्ती करवून देण्याचे आमिष दाखवून तो महिलांचे लैंगिक शोषण करायचा.

Crime News: Pretending to be a hypocrite by showing childless women the dream of childbirth, finally ... | Crime News: निसंतान स्त्रियांना अपत्यप्राप्तीचे स्वप्न दाखवून ढोंगी बाबा करायचा असं काम, अखेर...

Crime News: निसंतान स्त्रियांना अपत्यप्राप्तीचे स्वप्न दाखवून ढोंगी बाबा करायचा असं काम, अखेर...

Next

पाटणा - बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातून पोलिसांनी एका ढोंगी बाबाला अटक केली आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, हा ढोंगी बाबा अपत्यप्राप्ती करवून देण्याचे आमिष दाखवून तो महिलांचे लैंगिक शोषण करायचा. पोलिसांनी सांगितले की, कैलाश पासवान नावाच्या या बाबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. ही घटना उदाकिशुनगंज अनुमंडळातील आलमनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील भागीपूर गावातील आहे.

मधेपुराचे एसपी राजेश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधत या बाबाच्या कुकृत्यांचा पाढा वाचला. एसपींनी सांगितले की, हा बाबा भोळ्या भाबड्या निसंतान दाम्पत्यांना फसवायचा. जे त्यांच्या जाळ्यामध्ये यायचे, त्यांना औषधांच्या नावाखाली कुठला तरी नशेचा पदार्थ खाऊ घालायचा. तसेच ते बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. य बाबाच्या घरातून अनेक दाम्पत्यांचे फोटोग्राफ मिळाले आहेत. दरम्यान, या बाबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेली आहे, तसेच तो तुरुंगात जाऊन आला आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये या बाबाने सांगितले की, तो या धंद्यात गेल्या २०-२५ वर्षांपासून गुंतलेला हे. १०० पेक्षा अधिक दाम्पत्यांना त्याच्याकडील उपचारांमधून अपत्यप्राप्ती झाली आहे.  दरम्यान, अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या एका दाम्पत्याने त्यांच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर कैलाश पासवान नावाचा हा ढोंगी बाबा फरार झाला होता. अखेरीस त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.  

Web Title: Crime News: Pretending to be a hypocrite by showing childless women the dream of childbirth, finally ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.