Crime News Pune-Satara: ...तो पत्नीला सांगायचा तुझे विवस्त्र फोटो पाठव, रात्रीच्या वेळी...; सातारची विवाहिता पोलीस ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 07:58 AM2022-12-15T07:58:12+5:302022-12-15T07:59:58+5:30
पीडित विवाहिता २४ वर्षांची असून, ती पतीसमवेत पुणे येथे राहत होती. पती घराबाहेर गेल्यानंतर तिला फोन करायचा...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर पत्नीला तिचे विवस्त्र फोटो पाठविण्यास भाग पाडायचा; एवढेच नव्हे, तर सातत्याने अनैसर्गिक कृत्य करून पत्नीला यातना द्यायचा. अखेर या साऱ्या प्रकाराला कंटाळून पत्नीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीच्या विरोधात तक्रार दिली.
पीडित विवाहिता २४ वर्षांची असून, ती पतीसमवेत पुणे येथे राहत होती. पती घराबाहेर गेल्यानंतर पत्नीला फोन करायचा. ‘तुझे विवस्त्र फोटो पाठव’ म्हणून जबरदस्ती करायचा. पत्नी भीतीपोटी त्याच्या मोबाईलवर तसे फोटो पाठवायची. एवढेच नव्हे, तर विवस्त्र अवस्थेत पत्नीला झोपण्यास भाग पाडायचा.
वारंवार अनैसर्गिक कृत्य करून यातना द्यायचा. तसेच घरातील सासू, सासरेही तिचा छळ करायचे. या विकृत मानसिकतेला कंटाळून अखेर पीडित विवाहिता साताऱ्यात निघून आली. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली.