Crime News: एमजीएम दंत महाविद्यालयात रॅगिंग;चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल 

By वैभव गायकर | Published: September 11, 2022 03:16 PM2022-09-11T15:16:26+5:302022-09-11T15:17:17+5:30

Crime News: कामोठे येथील एमजीएम दंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचे त्याच महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी  रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Crime News: Raging in MGM Dental College; Case registered against four students | Crime News: एमजीएम दंत महाविद्यालयात रॅगिंग;चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल 

Crime News: एमजीएम दंत महाविद्यालयात रॅगिंग;चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल 

googlenewsNext

- वैभव गायकर 
पनवेल : कामोठे येथील एमजीएम दंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचे त्याच महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी  रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.महाविद्यालयातील अँटी रॅगिंग कमिटीने या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर त्यात तथ्य असल्याचे आढळून आल्यानंतर कमिटीने, रॅगिंग करणाऱ्या चार विद्यार्थ्यांविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीनुसार पोलिसांनी या चार विद्यार्थ्यां विरोधात महाराष्ट्र छळवाद प्रतिबंध अधिनियम १९९४ (४) नुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणात रॅगिंग झालेला विद्यार्थी महाविद्यालयात हॉस्टेलमध्ये राहतो. त्याच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी ऑगस्टमध्ये या विद्यार्थ्याचे रॅगिंग केले होते. या प्रकारामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या या विद्यार्थ्याने पालकांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्याच्या आईने महाविद्यालयातील अँटी रॅगिंग कमिटीकडे तक्रार केली.

तसेच, माझ्या मुलास पॅनिक अटॅक येत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या कमिटीने रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्यांची चौकशी करून त्याच्याकडून रॅगिंगसंदर्भात माहिती घेतली. त्यानंतर रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांसमोर चौकशी केली होती. या विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्याचे रॅगिंग केल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी त्या खोलीत असणाऱ्या इतर दोन विद्यार्थ्यांचादेखील या प्रकरणात सहभाग असल्याचे आढळून आले. यानंतर या महाविद्यालयाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमार्फत हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Crime News: Raging in MGM Dental College; Case registered against four students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.