क्रूरतेचा कळस! पायातील चांदीचे कडे निघत नसल्याने चोरट्यांनी महिलेचे दोन्ही पाय कापले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 05:49 PM2022-10-09T17:49:23+5:302022-10-09T17:50:16+5:30

चांदीचे कडे पायातून निघत नसल्याने त्यांनी वृद्ध महिलेचे पाय कापले आणि तिथून पळ काढला.

Crime News rajasthan elderly womans legs cut off in jaipur robbed of silver jewelery | क्रूरतेचा कळस! पायातील चांदीचे कडे निघत नसल्याने चोरट्यांनी महिलेचे दोन्ही पाय कापले अन्...

क्रूरतेचा कळस! पायातील चांदीचे कडे निघत नसल्याने चोरट्यांनी महिलेचे दोन्ही पाय कापले अन्...

googlenewsNext

राजस्थानच्या जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे. पायातील चांदीच्या कड्यासाठी एका 108 वर्षीय महिलेचे पाय कापल्याची भयंकर घटना समोर आली आहे. य़ा घटनेने एकच खळबळ उडाली आहे. महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात येत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरच्या गलता गेट पोलीस स्टेशन हद्दीतील मीना कॉलनीमध्ये ही भीषण घटना घडली. 108 वर्षीय जमुना देवी घरात एकट्य़ाच होत्या. रात्री त्या आपल्या मुलीसोबत झोपल्या होत्या. सकाळी मुलगी लवकर उठून मंदिरात गेली. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास संधी पाहून चोरट्यांनी जमुनादेवीच्या घरात घुसून त्यांना ओढत बाहेर बाथरूममध्ये नेलं. तिथे त्यांनी वृद्ध महिलेच्या पायात घातलेले चांदीचे कडे काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते काढण्यात त्यांना अपयश आलं.

चांदीचे कडे पायातून निघत नसल्याने त्यांनी वृद्ध महिलेचे पाय कापले आणि तिथून पळ काढला. वृद्ध महिलेच्या मानेवरही वार केले. घरी आल्यावर मुलीला आई घरामध्ये दिसली नाही. त्यावेळी तिचा शोध घेतला असता ती जखमी अवस्थेत बाथरूममध्ये पडलेली दिसली. तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News rajasthan elderly womans legs cut off in jaipur robbed of silver jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.