भयंकर! मालिकेत काम देतो सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; बलात्कार करून आयुष्य उद्ध्वस्त केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 03:56 PM2021-12-18T15:56:49+5:302021-12-18T16:00:39+5:30
Crime News : अमृत आणि पीडित तरुणीची ओळख झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांशी फोनवर बोलू लागले. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली.
नवी दिल्ली - देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. टीव्ही मालिकेत काम मिळवून देतो सांगत आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. फरिदाबादमध्ये ही घटना घडली असून एकच खळबळ उडाली आहे. खोटं बोलून आरोपीने तिला आपल्या जाळ्यात ओढलं आणि आता तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरिदाबाद पोलिसांनी आरोपीला 24 तासात अटक केली आहे. अमृत असे अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमृत हा बिहारचा तर पीडित तरुणी प्रयागराज येथील रहिवासी आहे. सहा वर्षांपूर्वी अमृत आणि पीडित तरुणीची ओळख झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांशी फोनवर बोलू लागले. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली. यावेळी त्याने पीडितेला आपण फिल्म निर्माता असल्याचे तरुणीला सांगितले. तसेच तिला मालिकेत काम मिळवून देण्याचे आश्वासनही दिले. पीडितेनेही आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.अमृतच्या सांगण्यावरून तरुणी 2 डिसेंबर 2021 रोजी दिल्लीत आली.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार
दिल्लीत आल्यानंतर आरोपीने तरुणीची भेट घेऊन तिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. आरोपीने तरुणीला सांगितले की, त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे आणि त्यासाठी तो तिच्या घरच्यांशीही बोलणार आहे. आरोपीच्या जाळ्याच फसत तरुणीनेही लगेचच हो म्हटलं. 5 डिसेंबरला आरोपी तरुणीला घेऊन फरीदाबाद एनआयटी परिसरात असलेल्या ओयो हॉटेलमध्ये आला. मुलीची तब्येत थोडी खराब झाल्यावर आरोपीने तिला गोळी दिली, त्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. यानंतर आरोपीने मुलीवर बलात्कार करून पळ काढला. दुसऱ्या दिवशी तरुणीने आरोपीला फोन केला असता त्याने फोन उचलणे बंद केले आणि मुलीचा नंबर ब्लॉक केला.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच केली तक्रार
आपल्यासोबत झालेली ही फसवणूक तरुणीच्या लक्षात येताच तिने 13 डिसेंबर रोजी पोलिसांत तक्रार दिली. तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, स्टेशन प्रभारी हुकुम चंद यांनी महिला निरीक्षक रितू यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले आणि आरोपीला पकडण्यासाठी डेहराडूनला पाठवले. पोलीस पथकाने आरोपीला डेहराडून, उत्तराखंड येथून अटक करीत त्याची कारागृहात रवानगी केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.