Crime News : रॉयल स्टाईल, मिशावर ताव देत सोशल मीडियावर शेअर केला फोटो, त्याच्या हँडसम लूकवर जळणाऱ्या आरोपींनी ८००किमीवरून येत केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 04:21 PM2022-03-19T16:21:51+5:302022-03-19T16:24:44+5:30

Crime News: एका तरुणाच्या हँडसम लूकवर जळणाऱ्या आरोपींनी या तरुणाचा सोशल मीडियावर मिशांवर ताव देत शेअर केलेला फोटो पाहिला. त्याचा फोटो पाहून तिळपापड झालेल्या आरोपीने या तरुणाची बाईकवरून तब्बल ८०० किमी प्रवास करून येत हत्या केली.

Crime News: Royal style, photo shared on social media blazing mustache, accused burning from his handsome look coming from 800 km for murder | Crime News : रॉयल स्टाईल, मिशावर ताव देत सोशल मीडियावर शेअर केला फोटो, त्याच्या हँडसम लूकवर जळणाऱ्या आरोपींनी ८००किमीवरून येत केली हत्या 

Crime News : रॉयल स्टाईल, मिशावर ताव देत सोशल मीडियावर शेअर केला फोटो, त्याच्या हँडसम लूकवर जळणाऱ्या आरोपींनी ८००किमीवरून येत केली हत्या 

Next

जयपूर - राजस्थानमधील पाली जिल्ह्यात एक धक्कादायक हत्याकांड घडले आहे. येथे एका तरुणाच्या हँडसम लूकवर जळणाऱ्या आरोपींनी या तरुणाचा सोशल मीडियावर मिशांवर ताव देत शेअर केलेला फोटो पाहिला. त्याचा फोटो पाहून तिळपापड झालेल्या आरोपीने या तरुणाची बाईकवरून तब्बल ८०० किमी प्रवास करून येत हत्या केली. जितेंद्र पाल मेघवाल असे, हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या हत्याकांडाबाबत समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी सूरज सिंह आणि जितेंद्र पाल यांच्यात दोन वर्षांपूर्वी वाद झाला होता. तेव्हापासून त्यांच्यात वैर होते. मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार तेव्हा जितेंद्रने सूरज सिंह आणि अन्य तिघांकडे डोळे वर करून पाहिले होते. त्यानंतर त्यांनी जितेंद्रला घरी जाऊन मारहाण केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर कारवाईही केली होती. त्यानंतर जितेंद्रला नोकरी लागल्याने त्याच्या लाईफस्टाईलमध्ये खूप बदल झाला होता.

आरोपी हा जितेंद्रचा हँडसम लूक आणि रॉयल पर्सनॅलिटीवर जळत असे. दरम्यान, जितेंद्रने मिशांवर ताव देत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे आरोपीचा खूप जळफळाट झाला. त्यानंतर आरोपींनी सूरतहून दुचाकीवरून ८०० किमी प्रवास करून जितेंद्रच्या येण्या-जाण्याच्या वाटेची रेकी केली. त्यानंतर पुढच्याच दिवशी त्याची चाकूने वार करून हत्या केली. दरम्यान, आता पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तर या हत्येमुळे समाजात संतापाचे वातावरण असून, मृताच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये नुकसान भरपाई आणि भावाला सरकारी नोकरी देण्याची मागणी केली जात आहे.  

Web Title: Crime News: Royal style, photo shared on social media blazing mustache, accused burning from his handsome look coming from 800 km for murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.