मला या महिलेपासून वाचवा...माझ्यासोबत वाईट काम करते! कोर्टात पोहोचला अल्पवयीन मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 10:51 AM2023-08-10T10:51:21+5:302023-08-10T10:51:42+5:30

Crime News : हैराण करणारी बाब म्हणजे जेव्हा पीडिताच्या परिवाराने याबाबत तक्रार करण्याच्या प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी दुर्लक्ष केलं. पण कोर्टाने आदेश दिल्यावर पोलिसांनी कारवाई सरू केली.

Crime News : Save me from this woman she does dirty things to me minor reached court with complaint | मला या महिलेपासून वाचवा...माझ्यासोबत वाईट काम करते! कोर्टात पोहोचला अल्पवयीन मुलगा

मला या महिलेपासून वाचवा...माझ्यासोबत वाईट काम करते! कोर्टात पोहोचला अल्पवयीन मुलगा

googlenewsNext

Crime News : उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका अल्पवयीन मुलासोबत तीन वर्ष जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. हैराण करणारी बाब म्हणजे जेव्हा पीडिताच्या परिवाराने याबाबत तक्रार करण्याच्या प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी दुर्लक्ष केलं. पण कोर्टाने आदेश दिल्यावर पोलिसांनी कारवाई सरू केली.

अमेठी जिल्ह्यातील एका गावातील ही घटना आहे. इथे अल्पवयीन मुलाला त्याच्या एका नातेवाईक महिलेने आपल्या गोड गोड बोलण्यात फसवून तीन वर्षासाठी त्याला सोबत नेलं. तीन वर्ष त्याचं शोषण करत शारीरिक संबंध ठेवत राहिली. महिलेने मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचं जेव्हा मुलाच्या परिवाराला समजलं तर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कसंतरी मुलाला महिलेच्या तावडीतून सोडवून परिवाराकडे सुपूर्द केलं. पण गुन्हा दाखल करून कोणतीही कारवाई केली नाही.

मला महिलेपासून वाचवा....!

दुसरीकडे अल्पवयीन मुलगा भलेही महिलेच्या तावडीतून सुटला, पण तिच्यापासून त्याला अजूनही मुक्तता मिळाली नव्हती. मुलगा त्याच्या घरी पोहोचल्यावर महिला सतत त्याच्यावर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होती. असं केलं नाही तर त्याला खोट्या केसमध्ये अडकवण्याची ती धमकीही देत होती. 

अशात पीडित परिवार पुन्हा एकदा पोलिसांकडे गेली. पण कोणतीही कारवाई झाली नाही. शेवटी परिवाराने कोर्टाकडे न्यायाची मागणी केली. आता कोर्टाने प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

तेच पूर्ण प्रकरण समोर येऊनही पोलीस केस दाखल करत नाहीये. पोलीस म्हणाले की, असा कोणताही आदेश अजून मिळाला नाही. आदेश मिळाल्यावर कारवाई केली जाईल. 

Web Title: Crime News : Save me from this woman she does dirty things to me minor reached court with complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.