संतापजनक! मुख्याध्यापकाचं विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन; घरच्यांनी शिकवला चांगलाच धडा, केली यथेच्छ धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 05:06 PM2021-09-20T17:06:18+5:302021-09-20T17:17:03+5:30
Crime News : शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचं उघड झालं आहे.
नवी दिल्ली - बिहारमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचं उघड झालं आहे. विद्यार्थिनीची छेड काढणं मुख्याध्यापकाला चांगलंच महागात पडलं आहे. नागरिकांनी ही घटना समोर आल्यानंतर त्याची यथेच्छ धुलाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापकावर आपल्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मुख्याध्यापकाला अटक करण्यात त्यांना यश आलं आहे.
जिल्ह्यातील सीमापूर परिसरातील पिपरी बहियार प्रायमरी स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या एका मुलीसोबत मुख्याध्यापकाने चुकीचं वर्तन करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या गालाचा चावा घेतला. यामुळेच मुलगी जोरात किंचाळली. आरडाओरडा करू लागली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोक रुमच्या दिशेने आले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
"आमचं एकमेकांवर प्रेम आहे, मला माझं आयुष्य जगू द्या, आमच्या जीवाला धोका"; तरुणीचा 'तो' Video व्हायरलhttps://t.co/Y6lrvzEeM9pic.twitter.com/gY7bX9dF75
— Lokmat (@MiLOKMAT) September 20, 2021
विद्यार्थिनीची छेड काढणं मुख्याध्यापकाला पडलं चांगलंच महागात
शाळेबाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला घेऊन जात असताना बाहेर जमलेल्या लोकांनी आरोपीवर अचानक हल्ला केला. पोलिसांच्या समोरच आरोपी मुख्याध्यापकाला काठीने बेदम मारहाण करत त्याची धुलाई केली. य़ाचे काही व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. यानंतर लोकांच्या तावडीतून पोलिसांनी मुख्याध्यापकाची सुटका केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बाबो! सोशल मीडियावर मृत्यूची बातमी व्हायरल झाल्यावर आमदाराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...https://t.co/9EV8mc837z
— Lokmat (@MiLOKMAT) September 20, 2021
नात्याला काळीमा! 'बाबांनीच आईला खूप मारलं'; 3 वर्षांच्या चिमुकल्याने सांगितलं नेमकं काय घडलं?
मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. एका महिलेच्या हत्येचा तपास पोलीस करत असताना या तीन वर्षांच्या मुलाने आपल्या आईसोबत काय घडलं, याची माहिती पोलिसांना दिली आणि आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आलं. तीन वर्षांच्या छोट्या मुलाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी हत्येचा सुगावा लावला आहे. तपासादरम्यान, हत्या झालेल्या महिलेच्या मुलाशी पोलीस बोलले तेव्हा त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. आपल्या वडिलांनीच आईला मारल्याचं म्हटलं आहे. जेवण चांगलं का बनवत नाहीस, असं विचारत वडील आपल्या आईला काठीने मारत होते. खूप वेळ वडिलांनी आईला काठीने बेदम मारहाण केल्यामुळे आई खाली पडली. आईला डॉक्टरकडे देखील नेलं नाही अशी माहिती मुलाने पोलिसांना दिली.
भयंकर! 'तो' क्षुल्लक वाद जीवघेणा ठरला, तीन वर्षांच्या चिमुकल्यामुळे लागला हत्येचा सुगावाhttps://t.co/icWixClF7y
— Lokmat (@MiLOKMAT) September 20, 2021