संतापजनक! 5 मिनिटं उशीर झाल्याने मुख्याध्यापकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; दोन्ही पाय फ्रॅक्चर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 11:10 AM2022-09-08T11:10:24+5:302022-09-08T11:11:13+5:30

विद्यार्थ्याला शाळेत यायला फक्त पाच मिनिटं उशीर झाला म्हणून मुख्याध्यापकाने त्याला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

Crime News shamli principal breaks both leg bones of student | संतापजनक! 5 मिनिटं उशीर झाल्याने मुख्याध्यापकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; दोन्ही पाय फ्रॅक्चर

संतापजनक! 5 मिनिटं उशीर झाल्याने मुख्याध्यापकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; दोन्ही पाय फ्रॅक्चर

Next

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याला शाळेत यायला फक्त पाच मिनिटं उशीर झाला म्हणून मुख्याध्यापकाने त्याला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. बेदम मारहाणी मुलाच्या पायाची हाडं तुटली असून दोन्ही पायाला फ्रॅक्चर झालं आहे. पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी मुख्याध्यापकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील विद्यार्थ्याचे आई-वडील आणि नातेवाईकांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शामली येथे आदर्श मंडी परिसरात ही भयंकर घटना घडली आहे. जय जवान जय किसान इंटर कॉलेमधील मुख्याध्यापकांनी आठवीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. त्याची चूक एवढीच होती की तो फक्त पाच मिनिटं शाळेत उशीरा आला. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. वडिलांनी आपल्या मुलावर उपचार केले आणि त्यानंतर थोडं बरं वाटल्यावर त्याला शाळेत सोडलं. 

मुलाच्या दोन्ही पायाला प्लास्टर

विद्यार्थी पाच मिनिटं उशीरा आला. त्याने शिस्त मोडली म्हणून त्याला मुख्याध्यापकाने मारहाण केली. मारहाणीत मुलाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. वडिलांनी मुलाला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिथे एक्स रे काढला. त्यावेळी हे सत्य समोर आलं. या मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. मुलाच्या दोन्ही पायाला प्लास्टर केलं आहे. पालकांनी मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News shamli principal breaks both leg bones of student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.