Crime News: धक्कादायक घटना, एका लिंबासाठी सासू आण नणंदेनं केली सुनेची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 09:25 AM2022-04-28T09:25:23+5:302022-04-28T09:31:09+5:30

Crime News: एका लिंबासाठी सासू आणि नणंदेने सुनेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सुनेचा गुन्हा एवढाच होता की तिने लिंबाच्या झाडावरून एक लिंबू तोडला होता. दरम्यान, आरोपी सासू आणि नणंद फरार झाल्या आहेत. 

Crime News: Shocking incident, mother-in-law and Nanda killed Sune for a lemon | Crime News: धक्कादायक घटना, एका लिंबासाठी सासू आण नणंदेनं केली सुनेची हत्या

Crime News: धक्कादायक घटना, एका लिंबासाठी सासू आण नणंदेनं केली सुनेची हत्या

Next

पाटणा - गेल्या काही दिवसांमध्ये लिंबांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र एका लिंबासाठी कुणी कुणाचा जीव घेतला असेल, यावर तुमचा विश्वास बसेल का? बिहारमध्ये एक लिंबासाठी जे काही घडले, ते वाचून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. बिहारमध्ये एका लिंबासाठी सासू आणि नणंदेने सुनेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सुनेचा गुन्हा एवढाच होता की तिने लिंबाच्या झाडावरून एक लिंबू तोडला होता. दरम्यान, आरोपी सासू आणि नणंद फरार झाल्या आहेत. 

ही घटना पूर्व चंपारण जिल्ह्यातील चैनपूर गावातील आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुनेने झाडावरील लिंबू तोडल्याने संतापलेल्या सासू आणि नणंदेने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली. याबाबत छौडादानो पोलीस ठाण्याचे प्रमुख मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, मृत महिलेचं नाव काजल देवी असं आहे. ती सुनील बैठा याची पत्नी होती.

पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मृत महिलेच्या डोक्यावर जखम आणि गळ्यावर दोरीची खूण दिसून आली आहे. पोलिसांना मृतदेह पोस्टमार्टेमसाठी जिल्हा मुख्यालय असलेल्या मोतिहारी येथील सदर रुग्णालयात पाठवले आहेत. मृत महिलेचे पती आणि सासरे कामानिमित्त बाहेरगावी राहतात. ही घटना घडली तेव्हा ते घरी उपस्थित नव्हते. त्यांनी सांगितले की, आरोपी सासू आणि दोन्ही नणंदा फरार आहेत. त्यांनी सांगितले की, मृत महिलेच्या सासरच्या मंडळींना माहिती देण्यात आली आहे.  

Web Title: Crime News: Shocking incident, mother-in-law and Nanda killed Sune for a lemon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.