Crime News: धक्कादायक! गमती-गमतीमध्ये गेला जीव, बहिणीने पाहिला भावाच्या मृत्यूचा लाईव्ह VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 15:28 IST2022-02-18T15:27:59+5:302022-02-18T15:28:31+5:30
Crime News: पाच बहिणींचा एकुलता एक लाडका भाऊ असलेल्या तरुणाचा गमती गमतीमध्ये बहिणीला व्हिडीओ कॉल सुरू असताना जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Crime News: धक्कादायक! गमती-गमतीमध्ये गेला जीव, बहिणीने पाहिला भावाच्या मृत्यूचा लाईव्ह VIDEO
रायपूर - पाच बहिणींचा एकुलता एक लाडका भाऊ असलेल्या तरुणाचा गमती गमतीमध्ये बहिणीला व्हिडीओ कॉल सुरू असताना जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्हिडीओ कॉलमध्ये या भावाने बहिणीला सांगितलं की तो आत्महत्या करत आहे. ही बाब ऐकून बहिणीला धक्का बसला. तिने भावाला असं काही न करण्याचा सल्ला दिला. तेव्हा भावाने तिला सांगितलं की तो गंमत करत आहे. त्याने तिला सांगितलं की आत्महत्या कशी करतात ते बघ. त्यानंतर त्याने पंख्याला टांगलेल्या फासामध्ये स्वत:चा गळा अडकवला. याचदरम्यान त्याच्या पायाखालील खुर्ची निसटली आणि त्याचा गळ्याला फास लागला. ते पाहून बहिणीने तत्काळ शेजाऱ्यांना फोन केला. त्यांनी घराकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्या तरुणाचे प्राण गेले होते.
ही धक्कादायक घटना छत्तीसगडमधील जशपूरमध्ये घडली आहे. येथील पत्थलगाव पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील बिलाईटांगर वॉर्ड क्र. ११ मध्ये रिझवान खानचा मृत्यू गळफास लागून झाला. ही दुर्घटना गेल्या बुधवार-गुरुवारी रात्री घडली. मृत तरुण हा पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. याबाबत माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तक्रार नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री ९ वाजता रिझवानने त्याच्या वडिलांसह कुटुंबीयांना बस स्टॉपवर पोहोचवले. तिथून ते रायपूरला रवाना झाले. दरम्यान घरी परतल्यावर त्याने बहिणीला व्हिडीओ कॉल केला आणि फास दाखवून आत्महत्या करण्याचा इरादा बोलून दाखवला. त्याच दरम्यान त्याच्या पायाखालील खुर्ची निसटली आणि त्याला गळफास लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.