Crime News : धक्कादायक! पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करत मित्रानेच केला खून,भवानी पेठेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 01:53 PM2020-10-02T13:53:15+5:302020-10-02T13:53:37+5:30

हत्या करणाऱ्या मित्राला पोलिसांनी केली अटक..

Crime News : Shocking! Murder of by friend due to former issue; incident in Bhavani Peth | Crime News : धक्कादायक! पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करत मित्रानेच केला खून,भवानी पेठेतील घटना

Crime News : धक्कादायक! पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करत मित्रानेच केला खून,भवानी पेठेतील घटना

Next

पुणे : भवानी पेठेतील सराईत गुन्हेगाराचा त्याच्याच मित्राने चाकूने वार करुन खुन केल्याचा प्रकार कोंढवा पोलिसांनी उघडकीस आणला असून मित्राला अटक केली आहे. सिद्धार्थ ऊर्फ धुमाळ मनोज शिरसवाल (वय २८, रा. सोलापूर बाजार, वानवडी)असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत अजय दादु खुडे (वय ३०, रा.कासेवाडी, भवानी पेठ) याचा खुन झाला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सिद्धार्थ आणि अजय खुडे हे पूर्वी एकत्र राहत होते.  त्यावेळी २०१७ मध्ये अजय याची पत्नी बेपत्ता झाली होती. त्याच्यामागे सिद्धार्थ याचाच हात असल्याचा संशय अजय होता. त्यावरुन त्याने सिद्धार्थवर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अजयविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यानंतरही अजय आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. सिद्धार्थला धमकावत होता. अजय आपल्याला मारुन टाकेल अशी भीती सिद्धार्थला वाटत होती. त्यामुळे सिद्धार्थ याने गोड बोलून अजय याला बुधवारी रात्री कोंढव्यातील पार्थी मैदानाजवळ बोलावले. तेथे मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अजय याच्यावर चाकूने वार करुन त्याचा खुन केला. गुरुवारी सकाळी नागरिक फिरायला गेले असताना त्यांना एका तरुणाचा मृतदेह पडलेला आढळून आला.  
अजय खुडे याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात चोरीचे ३ गुन्हे दाखल होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही तासात आरोपीला अटक करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Crime News : Shocking! Murder of by friend due to former issue; incident in Bhavani Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.