Crime News: धक्कादायक! बेडरुममध्ये गळफास लावून घेत होती पत्नी; पती व्हिडीओ बनवत होता...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 08:50 AM2022-10-26T08:50:46+5:302022-10-26T08:51:27+5:30
महिलेच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टेमसाठी पाठवला.
कानपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने पतीच्या समोरच बेडरुममध्ये पंख्याला गळफास लावून घेतला. पतीने तिला त्यापासून परावृत्त करण्याऐवजी तिचा व्हिडीओ काढत बसला होता. पती समजूत काढेल या आशेने ही महिला एकदा थांबली देखील परंतू तसे न झाल्याने ती पुन्हा फाशीच्या दोरखंडाला लटकली. यावेळी तिचा मृत्यू झाला.
महिलेच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टेमसाठी पाठवला. तसेच आरोपी पतीला देखील ताब्यात घेतले आहे. किदवई नगरच्या शोबिता गुप्ताचे चार वर्षांपूर्वी गुलमोहर भागातील संजीव गुप्तासोबत लग्न झाले होते. मंगळवारी दुपारी शोभिताने आत्महत्या केली. संजीवने याची माहिती तिच्या कुटुंबाला दिली. माहेरची मंडळी जेव्हा तिच्या घरी पोहोचली तेव्हा शोभिताचा मृतदेह बेडवर पडलेला होता. गेल्या काही काळापासून पती पत्नीमध्ये वाद सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शोभिताच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा शोभिताचा मृतदेह बेडवर पडला होता. जावई तिच्या छातीवर हमिंग करत होता. जेव्हा आम्ही त्याला विचारले तेव्हा त्याने मोबाईलमधील व्हिडीओ काढून दाखविला. आधीही तिने गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्याने तिला वाचविले होते, असे सांगितले. जेव्हा शोभिता गळफास घेत होती, तेव्हा जावई तिला वाचविण्याऐवजी तिचा व्हिडीओ काढत होता हे पाहून सर्वच हैराण झाल्याचे ते म्हणाले. या व्हिडीओमध्ये तो तू असेच करणार कारण तुझे विचारच तसे आहेत, असे तो बोलत आहे.
राजकिशोरने पोलिसांना सांगितले की, आम्ही स्वत: मुलीला रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.