Shraddha Murder Case: आफताबच्या चौकशीत मोठा खुलासा, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर चेहरा जाळला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 03:17 PM2022-11-17T15:17:01+5:302022-11-17T15:29:53+5:30
चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने म्हटले आहे, की आफताबची चौकशी सुरू असताना त्याच्या चेहऱ्यावर कसलाही तणाव जाणवत नव्हता...
मुंबईतीलश्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोजच्या रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. आता समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब अमीन पुनावालाने (Aftab Amin Poonawalla) श्रद्धाच्या हत्येनंतर, तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर मृदेहाची ओळख पटू नये, म्हणून तिचा चेहराही जाळला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आफताबने दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान हा खुलासा केला आहे.
ओळख लपवण्यासाठी अफताबने जाळला चेहरा -
श्रद्धाच्या हत्येतील आरोपी आफताब अमीन पुनावालाने दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर, डोके फेकण्यापूर्वी, ओळख लपवण्यासाठी आपण तिचा चेहरा जाळला होता, असे म्हटले आहे. एवढेच नाही तर, दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) चोकशीत, आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर, सर्वप्रथम, जे तुकडे खराब होऊ शकतात, असे तुकडे फेकल्याचा खुलासाही झाला आहे.
यासंदर्भात बोलताना आफताबची चौकशी करणाऱ्या एका अधिकाऱ्याने एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेशी लोबताना सांगितले, की आरोपी आफताबने पुरावे नष्ट करण्यासाठी आणि फरशीवर रक्ताचा एकही डाग दुसू नये म्हणून ब्लीच आणि केमिकलचा वापर केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताबने चौकशी दरम्यान सांगितले, की त्याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर, तीच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले होते. यानंतर त्याने तीच्या शरिराचे सर्व अवयव जंगलात फेकून दिले आणि अंगठा दुसऱ्या ठिकाणी फेकला.
चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने म्हटले आहे, की आफताबची चौकशी सुरू असताना त्याच्या चेहऱ्यावर कसलाही तणाव जाणवत नव्हता. पोलिस अधिकारी त्याच्यासोबत जेव्हा हिंदीत बोलतात तेव्हा तो इंग्रजित उत्तर देतो. तो पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये रात्री आरामात झोपतो. हत्येनंतर, आरोपी आफताबचे मित्रही त्याच्या घरी आले होते. मात्र, त्यावेळी त्याने ते पार्ट दुसऱ्या ठिकाणी लपवले होते.