भयंकर! आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेत संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 02:40 PM2021-06-27T14:40:38+5:302021-06-27T14:42:06+5:30

Crime News : आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Crime News son commits suicide for not raising money for mother funeral | भयंकर! आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेत संपवलं जीवन

भयंकर! आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेत संपवलं जीवन

Next

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या देवघर जिल्ह्यात किशन चौधरी याची आई ही गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. आईला वाचवण्यासाठी किशनने सर्वोतोपरी प्रयत्न केले. उपचारासाठी खूप खर्च देखील केला. मात्र आईला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. आईच्या उपचारासाठी पैसे खर्च केल्याने अंत्यसंस्कारासाठी त्याच्याकडे पैसेच नव्हते. 

किशनची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. आईच्या निधनाने त्याला फार मोठा धक्का बसला होता. गावकऱ्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र त्याच्याकडे अंत्यविधीचं सामान घेण्यासाठीही पैसे नव्हते. आईच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना किशन घरात गेला आणि आतून कडी लावून घेतली. नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी त्याला बाहेर बोलावलं असता त्याने खोलीचा दरवाजा उघडला नाही आणि आतून काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सर्वांना संशय आला. दरवाजा धक्का देऊन उघडला असता किशन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. 

किशनने खोलीत गळफास घेतल्याचं पाहून कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला. आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने तो खूप अत्यंत निराश झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. त्याने गळफास घेतल्याने त्याच्या पत्नीला मानसिक धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. किशनचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने घडत आहेत.  

खून का सौदागर! घरात सुरू होता रक्ताचा काळाबाजार; रुग्णांना दिलं गेलं दारुड्याचं रक्त अन्...

घरामध्ये रक्ताचा काळाबाजार सुरू असून दारुड्या व्यक्तींचं रक्त पुरवलं जात असल्याचा संतापजनक प्रकार आता उघडकीस आला आहे. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात पोलीस आणि आरोग्य विभागाच्या टीमने रक्ताचा काळात बाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही टोळी दारुड्यांचं रक्त काढून खासगी रुग्णालये आणि गरजवंतांना सप्लाय करत होती. नशा करणाऱ्या व्यक्तींचं रक्त चढवल्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू होता. कप्तानपाडा भागात गेल्या एक वर्षांपूर्वी राजकुमार मंडल नावाच्या तरुणाने घर खरेदी केलं होतं. या घरात रक्ताचा काळाबाजार केला जात होता. स्थानिक महिलांनी दररोज येथे 10 ते 12 दारूडे आणि रिक्षा चालक रक्त देण्यासाठी येत होते. राजकुमार हे रक्त सप्लाय करत होता.

Web Title: Crime News son commits suicide for not raising money for mother funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.