Crime News: मुलगा रडतोय, घरी चल, प्रियकराच्या घरी गेलेल्या पत्नीला पतीची आर्त विनवणी, तर महिला म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 04:59 PM2022-07-19T16:59:56+5:302022-07-19T17:00:48+5:30
Crime News: राजस्थान पोलिसांसोबत आलेल्या व्यक्तीने आपलं नाव सुनील असल्याचं सांगितसं. तसेच आपली पत्नी गेल्या ११ तारखेपासून घरातून बेपत्ता आहे, असे तो म्हणाला. याबाबतची तक्रार नीमराना पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. तसेच जी महिला आपली पत्नी आहे, असा दावा तो करत होता.
जयपूर - राजस्थानच्या नीमराना येथे पोलीस एका प्रेमी जोडप्याचा शोध घेण्यासाठी नारनौल येथे पोहोचले. प्रेमी जोडप्याच्या घरी गेल्यावर पोलीस आणि या जोडप्याच्या कुटुंबायांमध्ये बाचाबाची झाली. तर राजस्थान पोलिसांसोबत आलेल्या माजी सरपंचानेही त्यांना मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, वाद वाढत असल्याचे पाहून राजस्थान पोलीस आणि प्रेमी जोडप्याच्या कुटुंबीयांनी डायल ११२ वर फोन करत तक्रार दिली. त्यानंतर सर्वांना नारनौल पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
राजस्थान पोलिसांसोबत आलेल्या व्यक्तीने आपलं नाव सुनील असल्याचं सांगितसं. तसेच आपली पत्नी गेल्या ११ तारखेपासून घरातून बेपत्ता आहे, असे तो म्हणाला. याबाबतची तक्रार नीमराना पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. तसेच जी महिला आपली पत्नी आहे, असा दावा तो करत होता. त्याबाबतचे पुरावने म्हणून त्याने पोलिसांसमोर रेशन कार्ड आणि मुलगा झाल्यावर केलेल्या पूजेमधील एकत्रित फोटोही त्याने दाखवले. सुनील म्हणाला की, त्यांचा एक तीन वर्षांचा मुलगा आहे. तसेच तो आईपासून दूर राहू शकत नाही. त्याने रडून रडून सर्वांना हैराण केले आहे.
या सर्वांच्या सोबत आलेल्या माजी सरपंचांनी त्यांना मारहाण झाल्याचा आरोप केला आहे, ते म्हणाले की, ते गाडीत बसले होते. तसेच राजस्थान पोलीस प्रेमी जोडप्याच्या घरात होते. तेव्हाच काही जण आले आणि त्यांनी मारहाण सुरू केली. त्यात मला खूप दुखापत झाली आहे.
सुनील ज्या महिलेचा उल्लेख सुनील पत्नी म्हणून करत आहे, त्या महिलेने भलताच दावा केला आहे. ती म्हणाली की, सुनील तिचा भाऊ आहे. तसेच त्याचे आई वडील हेच आपले आई वडील आहेत. तसेच हे लोक ज्या मुलाला तिचा मुलगा म्हणून सांगत आहेत. तो प्रत्यक्षात तिचा पुतण्या आहे. तसेच मी माझ्या पतीच्या घरी असून, इथेच राहू इच्छिते.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत राजस्थान पोलिसांच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, एक तरुणी आहे. जिचा विवाह सिलारपूर नागौडी (राजस्थान) येथे झाला होता. त्याचा एक खटला आमच्याकडे आहे. त्याच्या तपासासाठीच आम्ही इथे आलोय. सदर तरुणीला सोबत न्यायचं आहे. तसेच कोर्टात जबाब नोंदवायचा आहे. आता हरयाणा पोलीसही नारनौल प्रकरणााच्या चौकशीमध्ये गुंतली आहे.