Crime News: अनैतिक संबंधांच्या संशयाचे भूत सासऱ्याच्या डोक्यात शिरले, सुनेसह पाच जणांना संपवले, नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 11:03 AM2021-08-24T11:03:32+5:302021-08-24T11:07:49+5:30
Crime News: अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका व्यक्तीने पाच जणांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. हत्या झालेल्यांमध्ये दोन मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
गुरुग्राम (हरियाणा) - हरियाणामधील गुरुग्राम येथून मनाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका व्यक्तीने पाच जणांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. (Crime News) हत्या झालेल्यांमध्ये दोन मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. ही घटना राजेंद्र पार्कमध्ये घडली आहे. येथे एका घरमालकाने त्याची सून, भाडेकरू, भाडेकरूची पत्नी आणि त्यांच्या मुलांची हत्या केली आहे. (Suspicion of immoral relationship, father-in-law kills five people including daughter-in-law )
हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आरोपीला त्याची सून आणि भाडेकरूमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने हे हत्याकांड घडवून आणले. त्यानंतर राव राय सिंह नावाचा हा आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचला. आता पोलिसांनी त्याला अटक करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
आरोपी सासरा हा निवृत्त सैनिक असल्याचे सांगण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिसरात त्याची ओळख आहे. तसेच त्याला ट्रीमॅन म्हणून ओळखले जाते. दरम्यान, पोलीस तपासामध्ये एका खाजगी बँकेत काम करणाऱ्या कृष्णा तिवारीसह एकूण ५ जणांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.
आरोपी राव राय सिंह हा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने पाच जणांची हत्या केल्याचा जबाब दिला. त्यामध्ये त्याच्या सुनेचाही समावेश होता. त्याचे बोलणे ऐकून पोलिसांना धक्का बसला. आरोपीला त्याची सून आणि भाडेकरूमध्ये अफेअर असल्याची शंका होती. त्यातूनच त्याने या हत्या केल्या.