Crime News: चिमुकलीच्या गळ्यातील जिवती हिसकावणारा ‘फ्रीज’ गजाआड, शहर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 09:24 PM2022-08-18T21:24:05+5:302022-08-18T21:24:49+5:30

Crime News:आईच्या खांद्यावर असलेल्या चिमुकलीच्या गळ्यातून जबरीने सोन्याची जिवती हिसकावून चोरट्याने पळ काढला होता. ही घटना बसस्थानक परिसरात १७ रोजी घडली होती.

Crime News: The 'freeze' that snatched the life of a little girl, city police action | Crime News: चिमुकलीच्या गळ्यातील जिवती हिसकावणारा ‘फ्रीज’ गजाआड, शहर पोलिसांची कारवाई

Crime News: चिमुकलीच्या गळ्यातील जिवती हिसकावणारा ‘फ्रीज’ गजाआड, शहर पोलिसांची कारवाई

Next

वर्धा : आईच्या खांद्यावर असलेल्या चिमुकलीच्या गळ्यातून जबरीने सोन्याची जिवती हिसकावून चोरट्याने पळ काढला होता. ही घटना बसस्थानक परिसरात १७ रोजी घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी तपासचक्र फिरवून आरोपीला बाजारपेठेतील कच्चीलाईन परिसरातून अटक केली. अक्षय ऊर्फ फ्रीज सुनील काळे (२०) रा. पारधी बेडा, वायफड, ह.मु. स्वागत कॉलनी, वर्धा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्रणाली केतन महल्ले, रा. किन्ही (मोही) ही तिच्या १८ महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन आईसह भावाला राखी बांधण्यासाठी टेकोडा येथे जाण्यासाठी वर्धा बस स्थानकावर गेली होती. बसची प्रतीक्षा करीत असतानाच अज्ञात चोरट्याने प्रणालीच्या खांद्यावर असलेल्या चिमुकलीच्या गळ्यात असलेली ५ हजार रुपये किमतीची सोन्याची जिवती हिसकावून पसार झाला होता. प्रणालीने याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली होती.

पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने तपासचक्रे फिरवून अक्षय ऊर्फ फ्रीज सुनील काळे यास शहरातील गजबजलेल्या कच्चीलाईन परिसरातून अटक केली. त्याच्याकडून सोन्याची जिवती हस्तगत करून अवघ्या काही तासांत गुन्हा उघडकीस आणला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुरेश दुर्गे, संजय पंचभाई, सुनील मेंढे, श्याम सलामे, सचिन पवार, प्रशांत कांबळे, जीवन आडे यांनी केली.

Web Title: Crime News: The 'freeze' that snatched the life of a little girl, city police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.