Crime News: खळबळजनक प्रकार! महिलेने किस करून घेतला तरुणाचा जीव, पोलीसही चक्रावले 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 06:51 PM2022-08-18T18:51:29+5:302022-08-18T18:52:26+5:30

Crime News: तुरुंगात कैदेत असलेल्या कैद्याला भेटण्यासाठी आलेल्या महिलेने किस करून त्याचा जीव घेतल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भेटायला आली असताना या महिलेने कैद्याला किस केले. त्यानंतर काही वेळातच त्या कैद्याचा मृत्यू झाला.

Crime News: The woman kissed the young man & Killed Him, the police were also confused | Crime News: खळबळजनक प्रकार! महिलेने किस करून घेतला तरुणाचा जीव, पोलीसही चक्रावले 

Crime News: खळबळजनक प्रकार! महिलेने किस करून घेतला तरुणाचा जीव, पोलीसही चक्रावले 

googlenewsNext

वॉशिंग्टन - तुरुंगात कैदेत असलेल्या कैद्याला भेटण्यासाठी आलेल्या महिलेने किस करून त्याचा जीव घेतल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भेटायला आली असताना या महिलेने कैद्याला किस केले. त्यानंतर काही वेळातच त्या कैद्याचा मृत्यू झाला. कैद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या हत्येचा आरोप ठेवून सदर महिलेला अटक करण्यात आली आहे.

ही घटना अमेरिकेतील आले. येथील टेनसीच्या तुरुंगामध्ये जोशुआ ब्राऊन नावाचा एक कैदी तुरुंगवास भोगत होता. रेचल डोलार्ड नावाची महिला त्याला भेटण्यासाठी आली होती. ब्राऊनला भेटण्यासाठी आली असताना या महिलेच्या तोंडामध्ये मॅथेफॅटामीन ड्रग्स होते. दोघांनीही किस केलं. यादरम्यान, रेचल हिने तिच्या तोंडातील ड्रग्स ब्राऊनच्या तोंडात टाकले. त्यानंतर ब्राऊनने संपूर्ण ड्रग्स एकाच वेळी गिळले. 

या ड्रग्सचं वजन हे सुमारे १४ ग्रॅम होते. ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे ब्राउनचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर टेनसी डिपार्टमेंट ऑफ करेक्शन म्हणजेच टीडीओसीच्या एजंट्सनी रेचल डोलार्डला ताब्यात घेतले. टीडीओसीने मंगळवारी माहिती देताना सांगितले की, रेचलवर टर्नी सेंटर इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये ड्रग्सची तस्करी आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी तिला अटक करण्यात आली आली असून, तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. रेचल हिला टेनसी डिपार्टमेंट ऑफ करेक्शनने हिकमॅन कौंटी जेलमध्ये ठेवले आहे. जोशुआ ब्राऊन याला ड्रग्सशी संबंधित प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आल्यानंतर ११ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याची शिक्षा २०२९ मध्ये संपणार होती.

अधिकाऱ्यांनी आरोप केला की, यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात भेटीच्या निमित्ताने रेचल याने ब्राऊनला ड्रग्स दिले होते. चौकशीमध्ये रेचलने ही गोष्ट मान्य केली होती. या घटनेनंतर टेनसी डिपार्टमेंट ऑफ करेक्शन आपल्या तुरुंगात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल, असे सांगितले.  

Web Title: Crime News: The woman kissed the young man & Killed Him, the police were also confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.