अरे देवा! मंदिराबाहेर चपला काढल्या, हात जोडून देवाची माफी मागितली अन् दानपेटीवर मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 01:50 PM2022-10-28T13:50:01+5:302022-10-28T14:00:32+5:30

एक चोर पांढऱ्या रंगाच्या कारमधून उतरताना सीसीटीव्हीत दिसत आहे. त्याने तोंड झाकलं आहे. त्याच्या उजव्या हातात दोन अंगठ्या आणि डाव्या हातात घड्याळ दिसत आहे.

Crime News thief absconded with donation box kept temple in jabalpur | अरे देवा! मंदिराबाहेर चपला काढल्या, हात जोडून देवाची माफी मागितली अन् दानपेटीवर मारला डल्ला

अरे देवा! मंदिराबाहेर चपला काढल्या, हात जोडून देवाची माफी मागितली अन् दानपेटीवर मारला डल्ला

googlenewsNext

मध्य प्रदेशमध्ये एक अजब घटना घ़डली आहे. जबलपूरमधील एका मंदिरातचोरी झाली आहे. विशेष म्हणजे चोर आलिशान कारमधून चोरी करण्यासाठी पोहोचला. चेहरा झाकून घेतलेल्या चोराने मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला आहे. चोरट्याने दिवाळीच्या एक दिवस आधी मंदिरातील दानपेटीवर लंपास केली. जबलपूरच्या गौर चौकी येथील सालीवाडा हनुमान मंदिरात हा धक्कादायक प्रकार घडला. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सालीवाडा येथे दिवाळीच्या निमित्ताने सर्वजण देवी महालक्ष्मीची पूजा करण्यात व्यस्त होते. तेव्हाच हाय प्रोफाईल चोर मंदिरात आला आणि दानपेटी घेऊन पसार पसार झाला. पण चोरी करण्यापूर्वी त्याने चपला मंदिराबाहेर काढल्या. मंदिराच्या दारात थांबून आधी हात जोडले आणि देवाची माफी मागितली. यानंतर मंदिरातील दानपेटी लंपास करुन तो पसार झाला. 

चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास हनुमान मंदिरात चोरी झाली. दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघडकीस आला. परिसरात राहणारे अजय दुबे पूजा करण्यासाठी मंदिरात पोहोचले. त्यावेळी त्यांना दानपेटी दिसली नाही. त्यांची याची माहिती ग्रामस्थांना दिली. सीसीटीव्हीत चोरी कैद झाली आहे. 

एक चोर पांढऱ्या रंगाच्या कारमधून उतरताना सीसीटीव्हीत दिसत आहे. त्याने तोंड झाकलं आहे. त्याच्या उजव्या हातात दोन अंगठ्या आणि डाव्या हातात घड्याळ दिसत आहे. याआधी जबलपूरमध्ये तीन महिन्यांआधी लक्ष्मी माता मंदिरात दानपेटी चोरीला गेली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Crime News thief absconded with donation box kept temple in jabalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.