Crime News: देशभरात मेल एक्सप्रेसमध्ये महिलांच्या पर्सवर डल्ला मारणारा चोरटा कल्याणमध्ये गजाआड, १३ गुन्हे उघडकीस

By मुरलीधर भवार | Published: August 12, 2022 05:50 PM2022-08-12T17:50:56+5:302022-08-12T17:51:39+5:30

Crime News: मेल-एक्सप्रेसमध्ये प्रवास करणा:या महिलांच्या पर्समधून पैसे आणि दागिने चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्यास कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Crime News: Thief who stole women's purses in mail express across the country nabbed in Kalyan, 13 crimes revealed | Crime News: देशभरात मेल एक्सप्रेसमध्ये महिलांच्या पर्सवर डल्ला मारणारा चोरटा कल्याणमध्ये गजाआड, १३ गुन्हे उघडकीस

Crime News: देशभरात मेल एक्सप्रेसमध्ये महिलांच्या पर्सवर डल्ला मारणारा चोरटा कल्याणमध्ये गजाआड, १३ गुन्हे उघडकीस

googlenewsNext

- मुरलीधर भवार

कल्याण - मेल-एक्सप्रेसमध्ये प्रवास करणा:या महिलांच्या पर्समधून पैसे आणि दागिने चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्यास कल्याणरेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शहजाद सय्यद असे या चोरट्याचे नाव असून, तो राहणारा अजमेरचा आहे. मात्र देशभरात रेल्वे गाड्यातून चोरी करतो. फक्त कल्याणमध्ये त्याने 13 चो-या केल्याचे उघड झाले आहे.

काही दिवसापासून कल्याणहून कसारा आणि कजर्तच्या दिशेने जाणा:या मेल एक्सप्रेसमध्ये चोरीच्या घटना वाढल्या होत्या. विशेष म्हणजे मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये महिलांचे पर्स चोरीच्या घटना घडत होत्या. महिला प्रवाशांच्या पर्समध्ये हात टाकून चोरटा मोठय़ा शिताफीने महागडय़ा वस्तू आणि पैसे लंपास करीत होता. कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत होते. पोलिस आयुक्त कैसर खालीद यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक अर्शद शेख, पोलिस अधिकारी प्रकाश चौगुले,शंकर परदेशी  पोलिस हवालदार रंजीत रासकर, वैभव जाधव, अजित माने, अक्षय चव्हाण यांच्या पथक या चोरट्याच्या शोधात होते. कल्याण रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक संशयीत पोलिसांच्या नजरेत आला. काही दिवसापूर्वी हा संशयीत तिकडे फिरत असताना पोलिसांनी पाहिले होते. त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सांगितले.

शहजाद सय्यद असे त्याचे नाव असून तोच या चोरीच्या घटना करीत होता. शहजाद हा मूळचा अजमेर येथे राहणारा असून सध्या तो कल्याणच्या पत्रीपूल परिसरात भाडय़ाने खोली घेऊन राहत होता. 2017 मध्ये अहमदाबाद पोलिसांनी शहजादला रेल्वेतील चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. हा देशभरात फिरून मेल एक्सप्रेसमध्ये प्रवास करुन महिलांच्या पर्सवर डल्ला मारतो. ही शहजादची चोरीची पद्धत आहे. कल्याणमध्ये त्याने 13 चो:या केल्या असल्याचे उघड झाले आहे. पुढील तपास रेल्वे क्राईम ब्रांच पोलिस करीत आहेत.

Web Title: Crime News: Thief who stole women's purses in mail express across the country nabbed in Kalyan, 13 crimes revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.