धक्कादायक! ‘एंजल’ ॲपवरून तरुणाला धमक्या; पैसे न भरल्यास नातेवाईकांना शिवीगाळ करण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 11:44 AM2022-02-22T11:44:12+5:302022-02-22T11:50:19+5:30

Crime News : खासगी कंपनीत इमेज एडीटर म्हणून काम करणाऱ्या या तरुणाच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअप क्रमांकवर अनोळखी नंबरवरून सुधीर कुमार नावाने पैसे भरण्याबाबत धमकीचे मेसेज आणि ऑडिओ मेसेज येऊ लागले.

Crime News Threats to youth from ‘Angel’ app; Warning to abuse relatives if not paid | धक्कादायक! ‘एंजल’ ॲपवरून तरुणाला धमक्या; पैसे न भरल्यास नातेवाईकांना शिवीगाळ करण्याचा इशारा

धक्कादायक! ‘एंजल’ ॲपवरून तरुणाला धमक्या; पैसे न भरल्यास नातेवाईकांना शिवीगाळ करण्याचा इशारा

Next

मुंबई : ‘दहा मिनिटांत पैसे परत कर, अन्यथा तुझ्या कॉल लिस्टमध्ये घुसून नातेवाईकांना शिवीगाळ करू’ अशा धमक्या एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉटसॲप टेक्स्ट आणि ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून ३३ वर्षीय तरुणाला देण्यात आल्या. हा व्यक्ती एंजल ॲपकडून मेसेज पाठवत असल्याचा दावा करत असून तरुणाने याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिला आहे.

खासगी कंपनीत इमेज एडीटर म्हणून काम करणाऱ्या या तरुणाच्या म्हणण्यानुसार, २० फेब्रुवारी रोजी सकाळी त्याच्या व्हॉट्सअप क्रमांकवर अनोळखी नंबरवरून सुधीर कुमार नावाने पैसे भरण्याबाबत धमकीचे मेसेज आणि ऑडिओ मेसेज येऊ लागले. तसेच दहा मिनिटांत पैसे न भरल्यास माझ्या मोबाइलमधील कॉल लिस्टमधील नातेवाईक व मित्रमैत्रिणींना फोन करून शिवीगाळ करण्यात येईल, असे यात नमूद केले होते.

हा क्रमांक अनोळखी असल्याने त्याने त्या क्रमांकावर फोन केला. तेव्हा तो मध्य प्रदेशच्या बिलासपूरमधुन विजय साहू व्यक्तीचा असून त्या व्यक्तीला या फोन कॉलबाबत काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर देखील त्याला त्याच क्रमांकावरून मेसेज तसेच ऑडिओ कॉल येत असून व्हॉट्सॲप कॉलवर काही लोक उत्तर प्रदेशमध्ये त्यांचे ऑफिस असल्याचा दावा करत शिवीगाळ करत आहेत. 

पीडित तरुणाने इन्स्टंट लोनसाठी अर्ज केला होता. मात्र, त्याला हव्या असलेल्या रकमेबाबत कोणतेही कन्फर्मेशन त्याला न देता भलतीच रक्कम त्याच्या खात्यात जमा करून अवघ्या पाच दिवसांत त्याची दुप्पट रक्कम देण्यासाठी त्याला या धमक्या देण्यात येत आहे. त्यामुळे अशा ॲपपासून लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

भलत्याच क्रमांकावर होतेय लॉगिन 

सदर भामटे हे अनोळखी व्यक्तीचा मोबाईल क्रमांक हॅक करत व्हॉट्सॲपवर लॉगिन करून कॉल करत अशा गोष्टी करतात. त्यामुळे त्याबाबत आपण सतर्क राहत अशा ॲपच्या जाळ्यात फसू नये, असा सल्ला वरिष्ठांकडून देण्यात आला.

 

Web Title: Crime News Threats to youth from ‘Angel’ app; Warning to abuse relatives if not paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.