Crime News: व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, तब्बल पाच कोटी ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 04:35 PM2022-01-11T16:35:35+5:302022-01-11T16:36:07+5:30

Crime News:   व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या तिघा जणांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण ‌विभागाने १० जानेवारी रोजी राजी उशिरा अटक केली. पोलिसांनी तब्बल पाच किलो वजनाची आणि पाच कोटी ९० हजार रुपये किंमतची व्हेल माशाची उल्टी जप्त केली.

Crime News: Three arrested for smuggling whale vomit, Rs 5 crore 90 thousand seized | Crime News: व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, तब्बल पाच कोटी ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत  

Crime News: व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, तब्बल पाच कोटी ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत  

googlenewsNext

रायगड  -  व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या तिघा जणांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण ‌विभागाने १० जानेवारी रोजी राजी उशिरा अटक केली. पोलिसांनी तब्बल पाच किलो वजनाची आणि पाच कोटी ९० हजार रुपये किंमतची व्हेल माशाची उल्टी, सुगंधी पावडर,दोन मोटार सायकरील हस्तगत केल्या आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी दर्पण रमेश गुंड (३९, मजगाव,मुरुड),नंदकुमार खंडू थोरवे (४१ नांदगाव, मुरुड) आणि राजेंद्र जनार्दन ठाकूर (५०,मजगाव) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अत्तर अथवा परफ्युम उद्योगात व्हेलमाशाच्या उलटीला बरीच मागणी आहे. परफ्युमचा वास दिर्घका‌ळ टिकवण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. मुरुडमधील तीन आरोपी हे व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी काशिद येथे सापळा लावला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सदगुरु कृपा गेस्ट हाऊस समोर तीन वक्ती मोटारसायकल वरुन आल्या त्यावे‌ळी पोलिसांनी कारवाई केली. उलटीची विक्री करण्याच्या गेल्या वर्षी दोन घटना घडल्या आहेत, तर आता नवीन वर्षात एक प्रकरण समोर आले आहे

Web Title: Crime News: Three arrested for smuggling whale vomit, Rs 5 crore 90 thousand seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.